Mangesh-Borhade 
पुणे

तू माझा फोन का उचलत नाहीस? असा जाब विचारला अन्....

सकाळवृत्तसेवा

महाळुंगे पडवळ - ‘तू या पूर्वी माझ्याबरोबर फोनवर वारंवार बोलत होती, आता माझा फोन का उचलत नाही?’ असा जाब विचारून मावस भावाने मावस बहिणीच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केले. साकोरे (ता. आंबेगाव) येथे बुधवारी (ता. १९) रात्री हा प्रकार घडला. त्यानंतर गुरुवारी (ता. २०) मावस भावानेही विषारी औषध घेऊन आत्महत्या केली.

याबाबत पोलिसांनी माहिती दिली की, साकोरे येथे अर्चना बाळासाहेब कडुसकर व तिची आई अलका या घरी होत्या. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अर्चना हिचा मावसभाऊ मंगेश सीताराम बोऱ्हाडे (वय ३०, रा. वाडा, ता. खेड) हा अचानकपणे घरी आला आणि ‘तू या पूर्वी माझ्यावर फोनवर वारंवार बोलत होती, आता माझा फोन का उचलत नाही?’ असे म्हणून त्याने अर्चना हिचे केस धरून ओढत घेऊन धारदार शस्त्राने तिच्या गळ्यावर वार केले. या वेळी अलका यांनाही मंगेश याने धक्काबुक्की केली. आरडाओरड केल्याने वस्तीतील लोकांची चाहूल लागताच मंगेश याने पोबारा केला. याबाबत अर्चना हिने मंचर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

शरद रामचंद्र कडुसकर यांनी अर्चना यांना मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. प्राथमिक उपचार केल्यानंतर तिला पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले होते. प्रकृती स्थिर झाल्याने पुन्हा मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात तिला आणले. घातक हत्याराने जबर दुखापत व खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी मंगेश याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन शिंदे व पोलिस नाईक राजेंद्र हिले पुढील तपास करत आहे.

दरम्यान, या घटनेनंतर मंगेश बोराडे याने गुरुवारी (ता. २०) साकोरे गावातील ओढ्याजवळ विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याला ग्रामस्थांनी मंचर ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र, डॉक्‍टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. याबाबतचा पुढील तपास मंचर पोलिस करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live : श्रेयस अय्यरचा अजंबित करणारा निर्णय; शुभमन गिलच्या संघाला दिली आयती संधी, जाणून घ्या संघांची Playing XI

IAS Transfers: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका; प्रशासनात नवे समीकरण

Dombivli Crime: आलिशान बंगल्यात मोठा शस्त्रसाठा अन्...; ‘गँगस्टर स्टाईल’ रील स्टारला पुन्हा अटक, ठाण्यात खळबळ

मुंबईचा 'Viv Richards' काळाच्या पडद्याआड! क्रिकेटपटू अनिल गुरव यांचे निधन; आचरेकर सरांचा आवडता खेळाडू, सचिनही त्यांना 'सर' म्हणायचा...

प्रेक्षकांना कसा वाटला 'आनंदी' मालिकेचा पहिला भाग? कुणाला आवडला तर कुणाला खटकला, म्हणतात- तारिणीला हरवण्यासाठी...

SCROLL FOR NEXT