Gopichand_Padalkar_BJP
Gopichand_Padalkar_BJP 
पुणे

बारामतीनंतर आता पुण्यात गोपीचंद पडळकरांविरुद्ध तक्रार दाखल

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्या प्रकरणी भाजपचे गोपीचंद पडळकर यांच्याविरुद्ध सहकारनगर पोलिस ठाण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पडळकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी या तक्रार अर्जाद्वारे करण्यात आली आहे. 

महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष व नगरसेवक विशाल तांबे यांनी ही तक्रार केली आहे. याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख, गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनाही पत्र पाठविण्यात आले आहे. राज्यात सध्या कोरोनाची साथ सुरु असून सर्व संघटना, पक्ष, संस्था या कोरोना नियंत्रित करण्यात गुंतले आहेत.

असे असतानाही भाजपने विधान परिषदेवर निवडून आणलेले आमदार गोपीचंद पडळकर यांनी चर्चेची कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले आहे. त्यांच्या या वक्तव्यमुळे जनक्षोभ उसळून समाजात तेढ निर्माण होईल, असे तांबे यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

तसेच राज्यात सध्या साथरोग नियंत्रण कायदा लागू आहे. असे असतानाही समाजात जाणीवपूर्वक उद्रेक घडवायचा, पवार यांच्यावर आतोनात प्रेम करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्ते, पदाधिकारी यांना मुद्दाम डिवचण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन कडक कारवाई करावी, अशी मागणी या तक्रारीद्वारे तांबे यांनी केली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: आक्रमक खेळणाऱ्या रुसोचा शार्दुल ठाकूरने उडवला त्रिफळा; चेन्नईला मिळाली तिसरी विकेट

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT