need 60000 private security guards in Pune city Pimpri Chinchwad and rural areas.jpg 
पुणे

बेरोजगार तरुणांनो, चिंता करु नका... तुम्हालाही मिळेल नोकरी ! वाचा 'ही' महत्वाची बातमी

सकाळवृत्तसेवा

पुणे : लॉकडाऊनमुळे तुमच्या हाताला काम नाही, तुम्ही बेरोजगार आहात, तर काळजी करु नका, कारण पुण्यात खासगी सुरक्षा क्षेत्रात सध्या 60 हजाराहुन अधिक सुरक्षा रक्षकांची गरज आहे. त्यामुळे किमान काही दिवसांसाठी तरी तुमच्या नोकरी प्रश्न सुटु शकेल आणि तुमच्या संसाराची विस्कटलेली घडी पुन्हा बसविण्यास मदत होऊ शकेल !

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 

कोरोनामुळे अनेकांच्या हाताचा रोजगार गेला, तर वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना स्वत:च्या कुटुंबाच्या काळजीपोटी गावचा रस्ता धरावा लागला. त्यामुळे एकीकडे हाताला काम नसलेल्याची संख्या असतानाच दूसरीकडे मात्र परप्रांतीय कामगार गावी गेल्यामुळे भूमीपुत्राना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.

आणखी वाचा - ऐकलंत का? पु.लं. येणार पुन्हा भेटीला

पुणे शहर, पिंपरी-चिंचवड व ग्रामीण भागात नोंदणीकृत तब्बल पावणे दोन लाख खासगी सुरक्षा रक्षक काम करत होते. त्यामध्ये परप्रांतीय सुरक्षा रक्षकांची संख्या मोठी होती. परंतु कोरोनामुळे परप्रांतीय कामगारांपैकी बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, उत्तरांचल, मध्य प्रदेश, कर्नाटक, पश्चिम बंगाल, आसाम येथील रहिवासी असलेल्या 70 टक्के सुरक्षा रक्षकांनी आपल्या गावी जाणे पसंत केले. त्यामुळे शहरामध्ये मागील दोन महिन्यापासुन खासगी सुरक्षा रक्षकांची मोठ्या प्रमाणात कमतरता जाणवु लागली आहे. त्यामुळे या क्षेत्रात तरुणाना नोकरी उपलब्ध करुन देण्यासाठी पोलिस प्रायव्हेट सिक्युरिटी
- पार्टनरशीप प्रोग्राम (पी  फोर फाउंडेशन)

आणखी वाचा - अन्यथा पंतप्रधान मोदी जबाबदारी असतील; पृथ्वीराज चव्हाण 

 इथे आहे सुरक्षा रक्षकांची गरज 
व्यावसायिक क्षेत्रात येणारे आयटी कंपन्या, विविध उत्पादने निर्मिती करणाऱ्या कंपन्या, शासकीय व निमशासकिय कार्यालये ( निविदा प्रक्रिया पूर्ण), मॉल्स, मोठमोठ्या सोसायटया, अपार्टमेंट, पंचतारांकीत हॉटेल्स, गोडाऊन, छोट्या कंपन्या (शंभर पेक्षा कमी कामगार असणाऱ्या) अशा असंख्य ठिकाणी काम करणारे खासगी सुरक्षा रक्षक गावी निघुन गेल्याने तेथे खासगी सुरक्षा रक्षकांची गरज निर्माण झाली आहे. 

पुण्यातल्या बनावट नोटांचं मुंबईच्या भेंडीबाजारशी कनेक्शन; लष्कराचा कर्मचारीच सूत्रधार

अशी मिळेल सुरक्षा रक्षकाची नोकरी
परप्रांतीय सुरक्षा रक्षक गावी गेल्याने मराठी तरुणाना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.शहरात 800 ते 900 सुरक्षा रक्षक एजन्सी आहेत.त्यांच्याकडे सुरक्षा रक्षकांची मागणी होत आहे. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड व ग्रामीण भागात 60 हजारहून अधिक सुरक्षा रक्षकांची सध्या गरज आहे. नववी, दहावी उत्तीर्ण होणाऱ्याना प्राधान्य दिले जाणार आहे. 18 ते 35 या वयोगतातील तरुणाना ही संधी उपलब्ध असून त्यांना 12 हजार 500 ते 18 हजार रूपयांपर्यंत पगार मिळू शकतो. पी फोर फाउंडेशनच्या नगर रोड येथील श्रमिक भवन येथे संपर्क साधु शकता किंवा  p4punegroup@gmail.com इमेलवर आपला बायोडेटा पाठवु शकता.

मजुरांना परत आणण्यासाठी महामेट्रोने 'असे' उचलले पाऊल!

"गेल्या दोन वर्षापासून पोलिस भरती झालेली नाही. त्यातच कोरोनामुळे पुणे, पिंपरी - चिंचवड व ग्रामीण भागात आता सुरक्षा रक्षकांची गरज भासत आहे. सध्या 60 हजार सुरक्षा रक्षकांच्या जागा आहेत. मराठी तरुणाना रोजगाराची चांगली संधी मिळू शकते. रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते."
- सचिन मोरे, मुख्य समन्वयक, पी फोर फाउंडेशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Tariff On India : रशियन तेलावरून वाद पेटला; भारतावर 500% टॅरिफ? ट्रम्प यांचा मोठा निर्णय

Bhusawal Politics : "मुस्कटदाबी कराल तर थेट गुन्हा दाखल करू!" : भुसावळ नगराध्यक्षा गायत्री भंगाळेंचा विरोधकांना कडक इशारा

Nashik Elections: प्रचाराला आणलेल्या महिला प्रतिस्पर्धी उमेदवाराने पळवल्या, पण पैसे न दिल्याने तुफान हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

IND vs NZ : तिलक वर्माच्या जागी T20 संघात कोणाला मिळणार संधी? ऋतुराज गायकवाडसह मुंबईकर फलंदाज शर्यतीत, कोण मारणार बाजी?

2026 मध्ये WhatsApp चॅटिंग बनलंय कलरफुल! जे लिहाल त्याचं बनेल 'स्टिकर'; पाहा कसं वापरायचं नवीन फीचर?

SCROLL FOR NEXT