Pune_Police 
पुणे

पुणे पोलिसांचे 'आपॅरेशन ऑल आउट'; नववर्षाच्या पूर्वसंध्येला 443 जणांना अटक!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरातील गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला शहरात गुन्हेगारांविरुद्ध खास 'ऑपरेशन ऑल आउट' ही विशेष मोहीम राबवीत सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. शहराच्या वेगवेगळ्या भागात झालेल्या या कारवाई पोलिसांनी तब्बल 2800 गुन्हेगारांची झाडाझडती घेतली. त्यामध्ये 434 सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी बेड्या ठोकत 16 लाखाचा मुद्देमालही जप्त केला. 

शहरामध्ये नववर्षाच्या पार्श्‍वभूमीवर कुठल्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले होते. त्यानुसार, पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे, सर्व परिमंडळ पोलिस उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त आणि सर्व पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या पथकांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवून गुन्हेगारांवर कारवाई केली. बुधवारी रात्री 10 वाजतापासून ते गुरुवारी पहाटे 1.30 वाजेपर्यंत परिमंडळ एक ते परिमंडळ पाचच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. स्थानिक पोलिस ठाण्यांच्या पथकांबरोबरच सर्व गुन्हे शाखांच्या पथकांनी यामध्ये सहभाग घेतला. 

पोलिसांनी केलेल्या या कारवाईमध्ये तब्बल 2 हजार 893 गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली. त्यामध्ये 756 गुन्हेगार पोलिसांना मिळून आले आहेत. तर 414 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबरोबरच 443 जणांना पोलिसांनी अटक केली. या कारवाईमध्ये पोलिसांनी 16 लाख 62 हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त केला आहे. पोलिसांनी बेकायदा अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी आठ जणांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून 7 पिस्तुले 1 गावठी कट्टा व 9 जिवंत काडतुसे असा, तीन लाख रुपयांचा हजारांचा मुद्देमाल जप्त केला. तर सिंहगड रोड पोलिस ठाण्याच्या परिसरात अमली पदार्थ (एमडी) बाळगल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून, त्याच्या ताब्यातून 7 लाख 56 हजार रुपये किमतीचे 63 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले आहे. 

बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी कारवाईदरम्यान शहरात 66 जणांना अटक करण्यात आली आहे. यावेळी त्यांच्या ताब्यातून 48 कोयते, 14 तलवारी, 1 कुकरी, 5 पालघन असा 17 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये गुन्हे शाखेने 38 गुन्हे दाखल करून 38 जणांना अटक केली. दरम्यान, 

गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी पथकाने दोन संशयित व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. त्यावेळी त्यांच्याकडून सव्वा तीन लाख रुपये किमतीची आठ चोरीची वाहने जप्त केली. तर गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने अडीच लाख रुपयांचा गुटखा जप्त केला. अंमली पदार्थ विरोधी पथकाने 18 हजार रुपये किमतीचा गांजा यावेळी जप्त केला. 

16 तडीपार पोलिसांच्या जाळ्यात 
विविध प्रकारचे गुन्हे केल्याने तडीपार केलेल्या गुन्हेगारांचा शहरात सर्रासपणे वावर सुरू होतो. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या विशेष कारवाईत शहरात शहरात बेकायदा वास्तव्य करणारे 16 तडीपार गुन्हेगार आढळले. त्यांच्यावर तडीपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रमाणे त्यांना अटक करण्यात आली. याबरोबरच शहरात संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या 28 जणांवरही कारवाई करण्यात आली.  

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meena river flood impact: मीना नदीत जलपर्णी व कचऱ्यामुळे प्रवाह अडला; पुराचे पाणी शेतात घुसून सुपीक माती वाहून, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

Pune Metro Delay: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचा मुहूर्त पुन्हा हुलकावणी; पीएमआरडीएच्या चौथ्या घोषणेलाही फोल

Smart Meter Policy: ग्राहकांच्या लेखी संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवणार नाही; राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठिय्या आंदोलनानंतर महावितरणचा शब्द

Apple Orchard Protection : समुद्रातील जुन्या जाळ्या अन् बांबूची कमाल! सफरचंदाच्या बागेसाठी शेतकऱ्याचा अजब जुगाड; फक्त 35 हजारांत माकडं अन् पक्ष्यांपासून मिळवलं 'सुरक्षा कवच'

मोठी बातमी! स्व. अजित पवार यांची जयंती अधिकृतपणे साजरी होणार; शासकीय कार्यक्रमांच्या यादीत समावेश

SCROLL FOR NEXT