leo.jpg 
पुणे

रात्रीचा अंधार...पावले न वाजविता तो आला...अन् मग पुढे काय... 

सकाळवृत्तसेवा

राहू : मेंढ्या शेतात चरण्यासाठी गेल्या मात्र वाडयावर (पालावर) असणा-या बक-यांवर बिबटयाने हल्ला करत नऊ बक-या ठार केल्या  ही घटना (ता. १६) सायंकाळच्या सुमारास पिंपळगाव (ता. दौंड) येथील गारदीबाबा नजीक थोरातवस्ती येथे घडली.

दरम्यान, हल्यात मृत्यूमुखी पडलेल्या बक-यांचा वनविभागाने पंचनामा केला आहे. तातडीने नुकसान भरपाई मिळण्याची मागणी येथील मेंढपाळ बाळू धुळा भिसे, पप्पू भिसे यांनी वनविभागाकडे केली आहे. नाथाचीवाडी, पिंपळगाव, देलवडी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबटयाचा वावर वाढलेला होता. यापुर्वी पाळीव प्राण्यांवर अनेकदा हल्ले करूनही पिंजरा लावण्यास वनविभाग टाळाटळ करत होते.

या परिसरात तातडीने पिंजरा लावून बिबटयाचा बंदोबस्त करण्याची मागणी राजेंद्र नातू, महेंद्र रासकर यांच्यासह ग्रामस्थांनी केली. वनविभागाच्या अधिका-यांनी बक-यांचे शवविच्छेदन करून पुढील अहवाल वनविभागाच्या वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी एम.एन. हजारे, पवार, अडागळे यांनी सांगितले.

नागरिकांना दिवसाही बिबटयाचे दर्शन घडत आहे. परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. परिसरात उसाचे दाट क्षेत्र असल्याने लपायला अधिक वाव आहे.  बिबट्याच्या दहशतीमुळे रात्रीच्या वेळी शेतकरी शेतातील पीकांना पाणी द्यायला जात नसल्याची परस्थिती आहे. रात्रीच्या वेळी शेतात एकटे न जाता समुहाने जा फाटके वाजवा. बिबटया दिसल्यास पाठलाग करू नका. असे तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी एम. एन. हजारे यांनी ग्रामस्थांना अहवान केले.

भिसे कुटूंबियांना अश्रू अनावर- मेंढया दिवसभर रानावनात चरण्यासाठी गेल्या होत्या. त्यांची लहान पिल्ले (कोकरी) पालात कोंडली होती. मात्र संध्याकाळी मेंढ्या घराच्या दिशेने पालावर आल्यावर मेंढ्यानी एकच हंबराडा फोडण्यास सुरूवात. मात्र सर्व नऊ लहान बकरी बिबट्याने फस्त केली होती. ही माहीती देताना मेंढपाळ बाळू भिसे, पप्पू भिसे यांना अश्रू आवरता आले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mira Bhayandar Morcha: आंदोलन मनसेचं आणि शिंदेंची फडणवीसांवर कुरघोडी? मीरा भाईंदर मोर्चामागचं राजकारण

MNS Mira Bhayndar Morcha: प्रताप सरनाईकांना पाहून मनसैनिकांच्या 50 खोकेच्या घोषणा, मीरा भाईंदर मोर्चामधून हाकलले

Jammu Kashmir Schools: उन्हामुळे काश्‍मीरमधील शाळांच्या वेळात बदल

Kolhapur Accident : साहिलवर होती कुटुंबाची जबाबदारी, कुरिअर सेवेनंतर विकायचा बिर्याणी; पार्सल देऊन लवकर येतो म्हणून गेला अन्...

Education News : राज्यभर ८-९ जुलैला शाळा बंद; शिक्षकांचे तीव्र आंदोलन सुरू

SCROLL FOR NEXT