Notice sent by Archeology Department to students staying at Korai fort
Notice sent by Archeology Department to students staying at Korai fort 
पुणे

कोराई गडावर रात्री मुक्काम करणे विद्यार्थ्यांना पडले महागात; वाचा काय घडले?

सकाळ वृत्तसेवा

पुणे : बेकायदेशीरपणे गडावर थांबून तेथे अन्न-पदार्थ शिजवणे एआयएसएसएमएस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना चांगलेच महागात पडले आहे. पुरातत्त्व विभागाने संबंधित विद्यार्थ्यांना नोटीस बजावली असून याबाबत लेखी खुलासा करावा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे त्यात नमूद आहे.

सारथी संस्थेसाठी खासदार संभाजीराजे आक्रमक; घेतला मोठा निर्णय!
 

एआयएसएसएमएसचे काही विद्यार्थी मुळशीमधील कोराईगडावर 4 जानेवारीला रात्री मुक्कामी थांबले. तसेच त्यांनी त्या ठिकाणी अन्न-पदार्थ शिजवले. मात्र हे सर्व करण्यापूर्वी त्यांनी कोणतीही परवानगी घेतली नव्हती. संबंधित किल्ला हा राज्य संरक्षित स्मारक आहे. त्यामुळे महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराण वस्तू शास्त्रविषयक स्थळे व अवशेष नियम 1962 मधील नियम क्रमांक नुसार स्मारकाच्या कोणत्याही भागाचे नुकसान होईल, असे कोणते कृत्य केल्यास तसेच पुरातत्त्व विभाग किंवा पुराणवस्तूशास्त्र अधिकारी यांनी परवानगी दिलेल्या क्षेत्रा व्यतिरिक्त इतर कोणत्याही ठिकाणी अन्न शिजवल्यास किंवा जेवण करणे बेकायदेशीर आहे. त्यात दोषी आढळल्यास कलम आठनुसार 500 रुपयांची शिक्षा तर कलम 21 नुसार तीन महिने कैद किंवा पाच हजार रुपयांचा दंड अशा दोन्ही शिक्षा होऊ शकता, असे विभागाचे सहाय्यक संचालक वि. पु. वाहणे यांनी पाठवलेल्या नोटीसमध्ये नमूद आहे.

पुणे : अजित पवार, भरणे यांच्या मंत्रिपदाच्या शपथविधीनंतर लाडू वाटून जल्लोष

विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी 5 जानेवारीला सकाळी गडावर गेल्यानंतर संबंधित विद्यार्थी त्यांना दिसले. त्यावेळी त्यांच्याकडे काही भांडी देखील होती. अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता विद्यार्थ्यांनी गडावर मुक्काम केला व अन्न शिजवल्याचे सांगितले.

FTII मधील PIFF चे चित्रपट प्रदर्शन रद्द कारण...
 

विद्यार्थ्यांची आवश्‍यक ती चौकशी करावी. कॉलेज स्तरावर त्यांना योग्य ती समज द्यावी. भविष्यात त्यांच्याकडून अशाप्रकारचे गैरकृत्य होणार नाही, असे हमीपत्र लिहून घ्यावे, अशी विनंती पुरातत्त्व विभागाने कॉलेजला केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Russia-Ukraine War: मानवी तस्करी प्रकरणी सीबीआयची मोठी कारवाई, रशियन नागरिकासह चौघांना अटक

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 08 मे 2024

ढिंग टांग : अस्सावा सुंदर नोटांचा बंगला..!

Latest Marathi News Live Update : अरुणाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.1 तीव्रता

SCROLL FOR NEXT