Now Double the rate for electricity connection in pune
Now Double the rate for electricity connection in pune 
पुणे

पुणेकरांनो, वीज कनेक्शन घेताय? मग, खिशाला लागणार कात्री कारण..

उमेश शेळेके

पुणे : तुम्ही पाचशे चौरस फुटांचा वन बीएचके फ्लॅट घेतला आहे. त्यासाठी नवीन वीजजोड घेण्यासाठी मार्चपूर्वी महावितरणकडे गेला असता, तर तुम्हाला 5 हजार 208 रुपये भरावे लागले असते. मात्र आता त्याच कामासाठी तुम्हाला 10 हजार 578 रुपये भरावे लागणार आहेत. कारण आता पुणे शहरात नवीन वीजजोडासाठी आकारण्यात येणाऱ्या सर्व्हिस कनेक्‍शन चार्जेस व प्रोसेसिंग फीमध्ये महावितरणने दुपटीहून अधिक वाढ केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप    
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महावितरणच्या वीजदरवाढीच्या प्रस्तावाला वीज नियामक आयोगाने नुकतीच मान्यता दिली. ही दरवाढ 1 एप्रिलपासून राज्यात लागू केली आहे. त्यानुसार प्रतियुनिट वीजदरासह नवीन वीजजोडाच्या शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सिंगल फेजच्या वीजजोडासाठी जादा शुल्क भरावे लागणार आहे. याउलट थ्री फेज म्हणजे साडेसात किलो वॉटवरील वीजजोडासाठी कमी शुल्क भरावे लागणार आहे. नवीन वीजजोडासाठी सर्व्हिस कनेक्‍शन चार्ज, 18 टक्के जीएसटी, याशिवाय सुरक्षा ठेव आणि प्रोसेसिंग फी असे चार प्रकाराचे शुल्क आकारले जाते.

कोरोनाला रोखण्यासाठी पुणे पोलिसांचे आणखी एक पाऊल; नागरिकांच्या प्रवासावर येणार... 

वीजजोडाचे 31 मार्चपूर्वीचे दर
(वन बीएचकेसाठी सिंगल फेज)
3, 100 सर्व्हिस कनेक्‍शन चार्ज
558 जीएसटी (18 टक्के )
1,500 सुरक्षा ठेव (3 किलो वॉट)
50 प्रोसेसिंग फी
5,208 एकूण


'पुणेरी पाटी'ने सुरु केलं ऑनलाइन युद्ध, विषय हैदराबादी बिर्याणीचा 

वीजजोडाचे 1 एप्रिलपासूनचे दर
(वन बीएचकेसाठी सिंगल फेज)

7,600 सर्व्हिस कनेक्‍शन चार्ज
1,368जीएसटी (18 टक्के)
1,500सुरक्षा ठेव (3 किलो वॉट)
110 प्रोसेसिंग फी
10,578 एकूण

विद्यार्थ्यांनो, सीए परीक्षेची तयारी करताय? वाचा महत्वाची बातमी

थ्री फेजसाठी 800 रुपये वाढ
साडेसात किलो वॉटपर्यंत सिंगल फेज वीजजोड दिला जातो. त्यापेक्षा अधिक म्हणजे साडेसात किलो वॉटच्या वर वापर असेल, तर त्याला थ्री फेज कनेक्‍शन घ्यावे लागते. त्यासाठी आकारण्यात येणारे सर्व्हिस चार्ज मार्चपूर्वी 13 हजार रुपये होते. त्यामध्ये वाढ करून ते 13 हजार 800 रुपये केले आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सांगोल्यात संतप्त मतदाराने EVM मशिन पेटवली

IPL 2024 : पावसामुळे बिघडणार प्लेऑफची शर्यत! SRH विरुद्ध LSG सामन्यापूर्वी हवामानाचे मोठे अपडेट

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी तीन वाजेपर्यंत देशात 50.71 टक्के मतदान; महाराष्ट्रात अजूनही सगळ्यात मागे

Crime: 'विषारी गोमांस देऊन सासरच्यांना संपवले!' 8 हत्या करून महिलेने भर कोर्टात नाकारले आरोप; वाचा संपूर्ण प्रकरण

Arvind Kejriwal: केजरीवालांची प्रतीक्षा लांबली! सुप्रीम कोर्टानं सुनावणी पुढे ढकलल्यानं कोठडीत वाढ

SCROLL FOR NEXT