Now People has to maintain social distancing in Mahatma Phule Mandai due to Corona  
पुणे

Corona Virus : पुणेकरांनो, आता महात्मा फुले मंडईतही पाळा 'सोशल डिस्टनसिंग'

सकाळवृत्तसेवा

पुणे : महात्मा फुले मंडई येथे भाजी खरेदी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर (सोशल डिस्टनसिंग) पाळावे, यासाठी विश्रामबाग पोलिसांकडून काही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार एकावेळी ५० नागरिकांना खरेदीसाठी प्रवेश देणे, येण्यासाठी व जाण्यासाठी दोन वेगवेगळे प्रवेशद्वार, वाहनांना बंदी या स्वरूपाच्या उपाययोजना आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये येत असलेल्या महात्मा फुले मंडई येथे नागरीक दररोज खरेदी करण्यासाठी मोठ्या संख्येने येतात. मात्र सध्या कोरोनाची साथ सुरू असल्याने शहरात संचारबंदी सुरू आहे. मात्र जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांना काही प्रमाणात मुभा देण्यात आली आहे. त्यादृष्टीने मंडई येथे खरेदी करण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन विश्रामबाग पोलिसांनी काही उपाययोजना केल्या आहेत.

पुणेकरांनो चिंता करू नका; शहराला पुरेल इतका भाजीपाला उपलब्ध

अशा आहेत पोलिसांनी केलेल्या उपाययोजना

- एकावेळी ५० नागरिकांना खरेदीसाठी प्रवेश
-  १५ ते २० मिनिटांनी दुसऱ्या ५० लोकांच्या गटाला प्रवेश 
-  मंडईमध्ये येण्यासाठी व बाहेर पडण्यासाठी दोन वेगवेगळे प्रवेशद्वार 
- सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी 
- घरातील एकाच सदस्याने भाजी खरेदीसाठी  पायी चालत यावे . 
- भाजी  व फळ विक्रेते यांनी हॅन्ड ग्लोज व सँनीटायझरचा वापर करणे बंधनकारक
- भाजी  व फळ विक्रेते यांच्यासमोर आखलेल्या जागेत थांबणे 

- मंडई परिसरातील रस्त्यावर बॅरिकडेस

मंडई परिसरातील गोटीराम भैय्या चौक, बुरूडआळी, अखिल मंडई मंडळ, रतन सायकल मार्ट या दिशेने जाणारे येणारे रस्ते  बेरीकटिंग करून बंद करण्यात आलेले आहेत. सध्या मंडईमध्ये खरेदीसाठी मंडई बस स्टॉप कडील मुख्य रस्ता चालू ठेवण्यात आला आहे. तर मंडईमधून बाहेर येणेसाठी फळबाजार कडील रस्त्याने बाहेर येण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

Corona Virus : देशात प्रथमच पोलिसांसाठी संजीवनी मोबाईल वाहनाचा प्रयोग'

"महात्मा फुले मंडई येथे भाजी खरेदी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी गर्दी होते. त्यामुळे लोकांनी सामाजिक अंतर (सोशल डिस्टनसिंग) पाळावे, यासाठी आम्ही काही उपाययोजना केल्या असून नागरीक त्याचे पालन करीत भाजीपाला खरेदी करीत आहेत."
- दादासाहेब चुडाप्पा , वरिष्ठ पोलिस निरीक्षक,  विश्रामबाग पोलिस ठाणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Ukraine: भारताकडून येणाऱ्या डिझेलवर युक्रेन घालणार बंदी? रशियाच्या तेल खरेदीमुळे अनेक देशांनी केलं लक्ष्य

Pune Crime : युवकांकडून संघटित गुन्हेगारी घडवण्यात बंडू आंदेकरचा हातखंडा

Asia Cup 2025: UAE च्या विजयाने पाकिस्तानला दिलंय टेन्शन! सुपर फोरमध्ये कोण मिळवणास स्थान?

Banjara Morcha: बंजारा समाजाच्या मोर्चात धनंजय मुंडेंना विरोध; वंजारा-बंजारा एक असल्याच्या विधानाचा निषेध

Nepal Sushila Karki Government : नेपाळच्या सुशीला कार्की सरकारचा मोठा निर्णय! आंदोलनात जीव गमावलेल्या ‘Gen-Z’ ना शहीद दर्जा!

SCROLL FOR NEXT