corona 
पुणे

पोटाच्या उपचारासाठी पुण्यात गेले...कोरोनाची टेस्ट केली तर... 

मनोज कुंभार

वेल्हे (पुणे) : वेल्हे तालुक्यातील कातवडी येथील ८५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकास कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पोटाच्या आजारावरील उपचार करण्यासाठी पुणे येथील एका खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांची कोरोनाची टेस्ट करण्यात आली होती, ती पॉझिटिव्ह आली आहे. त्यांच्या संपर्कातील एका व्यक्तीची स्वॅब वेल्हे येथील कोवीड केअर सेंटरमध्ये घेऊन पुढे पाठविण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अंबादास देवकर यांनी दिली आहे.

कातवडी गावच्या हद्दीलगत असलेल्या कोळवडी गावामध्ये लॉकडाउन कावलावधीमध्ये मुंबईहून आलेल्या व परत मुंबईला कामासाठी गेलेल्या ४८ वर्षीय व्यक्तीस कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले असून, या व्यक्तीने गावाकडे असणारे कुटुंब घेऊन जाण्यासाठी कोळवडी गावात येऊन पुन्हा दोन ते तीन दिवस मुक्काम केला आहे. त्यामुळे गावातील अनेक व्यक्तींच्या ते संपर्कात आल्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे गावात भितीचे वातावरण तयार झाले आहे. या व्यक्तीच्या संपर्कातील तीन जणांना आज तपासणीसाठी आरोग्य विभागाने वेल्हे येथील कोविड केअर सेंटरमध्ये नेले आहे. त्यांची स्वॅब पुढे तपासणीसाठी पाठविली आहे. 

दरम्यान, कोळवडी व कातवडी गावे सील करण्यात आली असल्याची माहिती वेल्ह्याचे तहसीलदार शिवाजी शिंदे यांनी दिली आहे.  
वेल्हे तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या ३७ वर पोहचली असून, ३४ रुग्ण बरे झाले असून, तीन जणांवर उपचार चालु आहेत. बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या इतरही व्यक्तींनी स्वतःहून पुढे येऊन तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभाकडून करण्यात आले आहे.

वेल्हे तालुक्यामध्ये रोजगारसंबधीचे कोणतेही मोठे उद्योग व्यवयाय नाहीत. त्यामुळे येथील बहुतांशी नागरिक हे उदरनिर्वाहासाठी पुणे व मुंबईसह शहरी भागामध्ये स्थलांतरीत झाले आहेत. तसेच, तालुक्यातील बरेसचे नागरिकसुद्धा शहरातुन ये- जा करत असतात. त्यामुळे तालुक्यामध्ये कोरोनाचा धोका वाढत चालला असला, तरी अनेकांना आपले घर चालविण्याची भ्रांत पडली आहे. हातावर पोट असणाऱ्या अनेक कुटुंबांना घर कसे चालवायचे, असा प्रश्न पडला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT