Crime_Arrest
Crime_Arrest 
पुणे

मनाली टू पुणे : कारमधून चरसची तस्करी, पोलिसांना चकवण्यासाठी घेतला महिलेचा आधार

सकाळ वृत्तसेवा

पुणे : गावातील एक विधवा महिला आणि तिच्या दोन मुलींना पुणे शहर दाखविण्याच्या बहाण्याने हिमाचल प्रदेशमधून कारमध्ये चरस घेऊन आलेल्याला खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. आरोपीने कारच्या मागील दरवाजाच्या टफच्या कुशनमध्ये चरसची पिशवी लपविली होती.
वीरेंद्र धातुराम शर्मा (वय ४०, रा.मनाली, जि.कुल्लू, हिमाचल प्रदेश) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून एक किलो ९०५ ग्रॅम चरस जप्त करण्यात आले आहे. त्याची किंमत ११ लाख ४३ हजार रुपये आहे. त्याचा मोबाईल आणि कार मिळून १६ लाख ५३ हजाराचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

रस्त्यात पोलिसांना संशय येऊ नये म्हणून त्याने संबंधित महिला आणि तिच्या दोन मुलींना आणले होते. त्यांना पुणे शहर दाखवण्याच्या बहाण्याने सोबत घेतले होते. कारवाई झाल्यावर संबंधित कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
हिमाचल प्रदेशातून एक कार अमली पदार्थ घेऊन पुण्यात येत असल्याची माहिती खंडणीविरोधी पथकातील पोलिस अंमलदार प्रदीप गाडे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस तांत्रिक आणि इतर माध्यमातून आरोपीच्या गाडीच्या मागावर होते. ही गाडी जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खडकी पोलिसांच्या हद्दीत आल्यावर पोलिसांनी सापळा लावून अडवली.

गाडी आणि चालकास ताब्यात घेऊन झाडाझडती घेण्यात आली. मात्र गाडीत काहीही न सापडल्याने पोलिसांनी गाडीचे कुशन आणि इतर गोष्टी उलगडून कसून तपासणी केली. तेव्हा गाडीच्या मागच्या दरवाजाच्या टफच्या कुशनमध्ये चरसची पिशवी लपवलेली आढळली. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे, उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, फौजदार संपत औचरे, पोलिस अंमलदार सुरेंद्र जगदाळे, सचिन अहिवळे, विजय गुरव, राहुल उत्तरकर, संग्राम शिनगारे, प्रदिप नाडे, भूषण शेलार, मोहन येलपले, रूपाली कर्णवर आणि आशा कोळेकर यांच्या पथकाने केली.

पोलिस हिमाचलमध्येही चौकशी करणार :
रेल्वे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी हिमाचल प्रदेशातून आलेला अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केला होता. यानंतर पुन्हा एकदा अमली पदार्थ व हिमाचल प्रदेशचे कनेक्‍शन उघड झाले आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांचे एक पथक हिमाचल प्रदेशात जाणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : दक्षिण कर्नाटक, आंध्रपर्यंत मजल, मॉन्सूनची वेगवान प्रगती; तमिळनाडूही व्यापला

Lok Sabha Exit Poll 2024 : बहुमतापासून भाजप दूर राहील; एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतरही काँग्रेसला विश्वास

Lok Sabha election 2024 : टपालाद्वारे आलेली मते सर्वप्रथम मोजा; ‘इंडिया’ आघाडी नेत्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

Lok Sabha Election 2024 : निकालानंतर भाजपमध्ये फेरबदल; अध्यक्षपद कोणाकडे दिले जाणार याकडे सर्वांचे लक्ष

चौरीचौरामधील स्मारक दुर्लक्षितच; शतकानंतरही देदीप्यमान इतिहासाच्या उपेक्षेमुळे नागरिकांत नाराजी

SCROLL FOR NEXT