one arrested for threatening to Married woman for marriage 
पुणे

विवाहितेशी लग्न करण्यासाठी 'भाईगिरी' करणाऱ्यास अटक 

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : "पतीला सोडून माझ्यासोबत रहा, आपण लग्न करू' असे म्हणत विवाहित महिलेला मारहाण केली. तसेच "मी इथला भाई आहे',असे म्हणत महिलेच्या पतीलाही चाकूचा धाक दाखवित धमकी दिली. त्यानंतर पुन्हा विवाहित महिलेच्या घरासमोर गोंधळ घालत 'भाईगिरी' करणाऱ्या आरोपीला सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना पिंपळे गुरव येथे घडली. 


पुणे धावले! बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद

याप्रकरणी 27 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार इसाक उर्फ गुड्ड्या रज्जाक शेख (रा. गल्ली क्रमांक तीन, जवळकरनगर, पिंपळे गुरव) याला अटक केली आहे. आरोपीने फिर्यादी महिलेचा वारंवार पाठलाग केला.


पुणे हाफ मॅरेथॉन'मध्ये गोरखा रेजिमेंटचा तीर्थ पुन विजेता

"तु तुझ्या पतीला सोडून माझ्यासोबत रहा, आपण लग्न करू' असे आरोपी म्हणाला असता त्यास फिर्यादीने नकार दिला. त्यानंतर गुरूवारी (ता. 21) दुपारी एकच्या सुमारास आरोपी हा फिर्यादी राहत असलेल्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये आला. त्याठिकाणी उभ्या असलेल्या फिर्यादीच्या पतीच्या अंगावर धावून जात 'मी इथला भाई आहे' असे म्हणत त्यांना शिवीगाळ केली. यासह फिर्यादी महिलेलाही मारहाण केली. यामध्ये त्या जखमी झाल्या. त्यानंतर फिर्यादीच्या शेजारील फ्लॅटच्या दरवाजावर लाथा मारून कडी तोडून दरवाजाचे नुकसान केले. त्यानंतर पुन्हा फिर्यादीच्या पतीला फोनवरून शिवीगाळ करून धमकी दिली. सांगवी पोलिस तपास करीत आहेत.

गोवा निर्मित सव्वा कोटींची अवैध दारु पुण्यात पकडली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT