crime 
पुणे

पुणे : बायकोच्या आत्महत्येच्या पोलिस चौकशीला 'तो' कंटाळला अन्...

सकाळ वृत्तसेवा

विश्रांतवाडी : पत्नीच्या आत्महत्येस दोन वर्ष उलटल्यानंतर पोलिस कर्मचाऱ्याने गुन्हा दाखल करण्याची त्याला धमकी दिली. वारंवार पोलिस चौकीत बोलावून त्रास दिल्यामुळे एकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (ता.15) सायंकाळी सात वाजता घडली.

मृताच्या नातेवाईकांनी पोलिस कर्मचाऱ्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने विश्रांतवाडी परिसरात तणाव निर्माण झाला. शरद शिवाजी गुंजाळ (वय.40, रा.भैरवनगर, धानोरी) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. गुंजाळ हे वाहनचालक होते. त्यांचे 2007 मध्ये रंजना यांच्याशी विवाह झाला होता.

दरम्यान, दोन वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीने आत्महत्या केली. त्याबाबत विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यु अशी नोंद करण्यात आले. मात्र सासरच्यांच्या जाचास कंटाळूनच रंजनाने आत्महत्या केल्याचा संशय आहे, त्यामुळे गुंजाळविरुद्ध तक्रार देणार असल्याचे रंजना यांच्या भावाने म्हंटले होते.

काही दिवसांपूर्वी अचानक अकस्मात मृत्युच्या प्रकरणाचा तपास करण्याचे काम एका पोलिस कर्मचाऱ्याकडे आले होते. त्यानुसार, संबंधीत पोलिस गुंजाळ यास सातत्याने पोलिस चौकीत बसवून ठेवत असे. पोलिस चौकीला न आल्यास गुन्हा दाखल करण्याची धमकी देत होता. सोमवारीही भोर याने गुंजाळला बोलाविले, मात्र त्याने येण्यास नकार देताच, त्याला गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली.

या सगळ्या प्रकारास कंटाळून गुंजाळने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला. तसेच मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

पत्नीच्या आत्महत्या प्रकरणी गुंजाळ यास जबाब घेण्यासाठी बोलाविणे हा तपासाचा भाग आहे. त्यामध्ये त्रास देण्याचा उद्देश नसतो. तरीही या प्रकरणाची सखोल चौकशी करून, त्याबाबतचा अहवाल वरिष्ठांना सादर केला जाईल.

- अरुण आव्हाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, विश्रांतवाडी पोलीस ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Election 2025: पुण्यातल्या भाजप-शिवसेना युतीची इनसाईड स्टोरी; 'त्या' 15 जणांची नावं आली समोर, शिवसेनेने 140 एबी फॉर्म वाटले

Sassoon Hospital : आईच्या किडनीदानातून मुलाला नवे जीवन; ससून रुग्णालयामध्ये ३५ वी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया!

Maharashtra Teacher Recruitment : आता शिक्षक भरतीची प्रक्रिया 'परीक्षा परिषदेमार्फतच' होणार; उमेदवारांकडून तीव्र नाराजी व्यक्त!

India Economy: गुड न्यूज! भारत बनला जगातली चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; जपानला टाकलं मागे, GDP किती?

Latest Marathi News Live Update : पुण्यात आणखी एका गुंडाने भरला उमेदवारी अर्ज

SCROLL FOR NEXT