lock down 
पुणे

सासवडकरांनो, लाॅकडाउनचे नियम पाळा, पुरंदर तालुक्यात कोरोनाचे शतक...

श्रीकृष्ण नेवसे

सासवड (पुणे) : पुरंदर तालुक्यातील सासवड शहरातील कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांचा आकडा दोनने वाढला. शहरातील कोरोना रुग्णांची संख्या 69 वरून 71 वर पोचली आहे. नित्यपणे रुग्ण आढळून येण्याचे सत्र थांबत नसल्याने सासवडकर आज लागू झालेल्या लाॅकडाउनमध्येही चिंताग्रस्त झाले आहेत. तर, तालुक्यातील धनकवडी येथे एक रुग्ण सापडला आहे. त्यामुळे तालुका शतक ओलांडत 101 वर पोचला. तालुक्यातील 70 टक्के रुग्ण एका सासवड शहरातील आहेत. 

याबाबत तहसीलदार रुपाली सरनौबत यांनी माहिती दिली. तसेच, आजपासून तालुक्याची बाजारपेठ असलेल्या सासवडला पालिकेचे मुख्याधिकारी विनोद जळक यांनी शहरात लाॅकडाउन केल्याने रुग्ण सापडण्याची साखळी कमी होण्याची आशा आहे. पण, सासवड शहरातील परिस्थिती पाऊणशतकाच्या दिशेने असताना  प्रशासनामार्फत लाॅकडाउनचा ठोस निर्णय केला. याबाबत जाणकार समाधानी आहेत. आता बाहेरुन ये- जा करणारांना पालिकेत नोंदणी, कोरोनाबाबत वैद्यकीय प्रमाणपत्र, होम क्वारंटाइन राहणे, यावर पालिकेने आदेश बजावले आहेत. त्याची अंमलबजावणी शंभर टक्के झाली; तर शहरात संसर्गावर नियंत्रण येईल., असेही स्पष्ट आहे.

सासवड शहर व परिसराचा हा वेग असाच राहू नये म्हणून विचाराअंतीच लाॅकडाउन केला आहे. शिवाय शिस्त पाहण्यासाठी पालिकेने आठ पथके तैनात केली आहेत. तालुक्यात अगोदर मुंबई कनेक्शनमधील रुग्ण सापडत होते. आता पुणे कनेक्शनमधून रुग्ण आढळून येताहेत.  तर, स्थानिक पातळीवर घरातल्या घरात होणारे कनेक्शनही पुणे किंवा बाहेर गावी जा- ये करणाऱ्यांमधून पांगत आहे. त्याला सूक्ष्म पद्धतीने आळा घातला, तर सासवड शहरातील स्थिती नियंत्रणात येईल, अशी आशा आहे.

सासवडसह पुरंदर तालुक्यात गेल्या बारा दिवसातं संसर्गाचा वेग जिल्ह्यात जरा जास्तच आहे. सहा दिवसांपूर्वीच सकाळी रुग्ण संख्येत सासवड 31 वर होते. आज 71 वर पोचून अल्पावधीत 40 रुग्ण वाढलेत. तालुका या दिवसात 50 वरुन आज 101 वर गेला. आजच्या पाॅझिटिव्ह 3 पैकी 2 रुग्ण सासवडचे व 1 नजिकच्या धनकवडी गावातील  आहे. सासवडमधील दोन्ही नवीन रुग्ण व धनकवडीचा (दवणेवाडी) रुग्ण जुन्या रुग्ण संपर्कातील आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT