One killed in a collision of two wheeler coming from opposite direction 
पुणे

विरुद्ध दिशेने आलेल्या भरधाव दुचाकीच्या धडकेत एक ठार 

सकाळ वृत्तसेवा

पुणे : रस्त्यावरून विरुद्ध दिशेने भरधाव आलेल्या दुचाकीने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. 

पुणे : सफरचंदापेक्षा कांदा महाग; किलोला तब्बल एवढा भाव  
प्रशांत ज्ञानेश्‍वर टोंगळे (वय 47, रा.चिंतामणीनगर, सुभाष पार्क, हांडेवाडी रस्ता, हडपसर) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी प्रवीण टोंगळे यांनी (वय 44) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अनोळखी दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे : सणसरजवळ युवकाचा खून

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे भाऊ प्रशांत टोंगळे हे मंगळवारी रात्री साडे दहा वाजता त्यांच्या दुचाकीवरून जात होते. त्यांची दुचाकी ससाणे रोडवरील डिमार्टसमोर आली. त्यावेळी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करीत विरुद्ध दिशेने भरधाव आलेल्या दुचाकीने टोंगळे यांच्या दुचाकीस समोरून जोरदार धडक दिली. त्यामुळे टोंगळे खाली पडून त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला.

  #Hyperloop ‘हायपर लूप’चे काय होणार?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Crime: सातारा हादरला! 'चिकन 65 फुकट न दिल्याने दगडफेक'; 10 जणांवर गुन्हा, दोन हल्‍लेखोर ताब्‍यात

ऑनर किलिंगने हादरलं सूर्यापेट! आंतरजातीय प्रेमविवाहामुळे युवकाची क्रूरपणे हत्या; पत्नी म्हणाली, 'मी स्वप्नातही देखील..'

Latest Marathi News Updates : जयशंकर यांनी सिंगापूर दौऱ्यात विवान बालकृष्ण यांची भेट घेतली, दोन्ही नेत्यांमध्ये आर्थिक संबंधावर चर्चा

Satara Crime: 'वेळेनजीक सोन्या-चांदीच्या व्यापाऱ्याला लुटले; वीस लाख लंपास, अपहरण करून पाय बांधले अन्..

Chandu Chauhan : ‘सर्जिकल स्ट्राइक’मधील वादग्रस्त चंदू चव्हाण अटकेत; पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT