kadam1.jpg 
पुणे

कोरोनाग्रस्तांसाठी `त्यांनी` दिला मदतीचा हात

सकाळवृत्तसेवा

कॅन्टोन्मेंट (पुणे) : कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी पुणे शहर व जिल्ह्यातील महाराष्ट्र मेहतर, वाल्मिकी समाजाच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक लाख नऊ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. 
सहकार, कृषि, सामाजिक न्याय, अन्न नागरी पुरवठामंत्री विश्वजीत कदम यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

राज्यामध्ये सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत असलेले मेहतर वाल्मिकी, व अनुसूचित जातीमधील 95 टक्के समाज सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. कोरोना सारख्या वैश्विक महामारीच्या संकट काळात समाज कोरोना योद्धा म्हणून कर्तव्य बजावित आहे. समाजाच्या सामाजिक, धार्मिक, राजकीय, विविध सामाजिक संघटना, मंडळे, कामगार संघटना कार्यकर्ते प्रतिनिधी व लोकांनी सुद्धा आपआपल्या परीने गरजवंताना भोजनाची व्यवस्था करून मदत केलेली आहे.

याप्रसंगी अध्यक्ष कविराज फत्तू संघेलिया, महासचिव, आनंद मोहन चव्हाण, कार्याध्यक्ष राजेश रामकिशोर बडगुजर, विजयकुमार जाधव, नरोत्तम चव्हाण, ऍड कबीर बिवाल, बलराम लख्खन, गुलाब चव्हाण,  मनोज पटेलिया, विनोद निनारिया आदी उपस्थित होते.
 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महाराष्ट्र शासन व आपल्या राज्याची जनता नेहमीच सफाई कर्मचारी यांच्या विविध मागण्यांच्या  संदर्भात पाठीशी उभी राहून सकारात्मक निर्णय घेऊन समाजाला मदत केलेली आहे, त्याचे स्मरण ठेवून राज्याच्या आर्थिक बिकट समयी वंचित उपेक्षित पद दलित गरीब समाजा कडून ही मदतीचा खारीचा वाटा उचलण्याचा छोटासा प्रयत्न या समाजाने केला आहे. पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर व जिल्ह्यातील मेहतर वाल्मिकी समाजाच्या नावाने मुख्यमंत्री सहायता निधि-कोविड-19 करिता गोळा करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साप्ताहिक राशिभविष्य : २८ डिसेंबर २०२५ ते ३ जानेवारी २०२६

New Marathi Book Releases 2025 : साहित्याची नवी मेजवानी; कुस्तीच्या लाल मातीपासून ते करिअरच्या यशोगाथेपर्यंत, वाचा ५ खास पुस्तके!

Marathi Literature Fiction : "निसर्ग काही भव्य रचण्यात वा मोडण्यात मग्न आहे..." मानवी अस्तित्वाचा वेध घेणारा एक अस्वस्थ संवाद

Self-driving car technology 2030 forecast : रस्त्यावरचा नवा 'धुरंधर'; चालकविरहित स्वयंचलित वाहनांच्या युगाचा उदय!

National Food : भारताचे राष्ट्रीय जेवण काय आहे? 99 टक्के लोकांना माहिती नाही उत्तर

SCROLL FOR NEXT