corona p.jpg 
पुणे

धक्कादायक : पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डातील एक कर्मचाऱ्याला कोरोनाचा संसर्ग.... 

सकाळवृत्तसेवा

कॅन्टोन्मेंट (पुणे) : पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणूचा कहर झाला आहे. बोर्ड प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करून कोरोनावर मात करण्याचा प्रयत्न करीत आहे. दरम्यान बोर्डाच्या गोळीबार येथे असलेल्या कार्यालयातील एका कर्मचा-याला कोरोना झाला असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचारी सध्या वर्क फ्रॉम होम करत आहेत.

 कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या प्रशासकीय कार्यालयात कार्यरत असलेल्या एका कर्मचा-यास कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे प्रशासनाने सर्व कार्यालयच लॉकडाउन केले आहे. सध्या केवळ मुख्य कार्यकारी अधिका-यांसह काही नगरसेवक कार्यालयात उपस्थित असल्याचे चित्र दिसून आले आहे. त्यामुळे कार्यालयात एकच खळबळ उडाली. या कर्मचा-याच्या सानिध्यात आलेल्या प्रत्येकाचीच तपासणी करण्यात आली.

दरम्यान, संबधित कर्मचा-यावर उपचार सुरू आहेत. तसेच संपूर्ण कार्यालयात औषधांची फवारणी करण्यात आली आहे. याबरोबरच संपूर्ण कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांना घरून काम करण्याच्या सूचना मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी दिल्या आहेत. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिका-यांची केबिन वगळता इतर सर्व विभाग लॉक करण्यात आले आहेत.
 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

 या कर्मचाऱ्याला अचानक थंडी आणि तापाची लक्षणे दिसू लागल्याने त्याची कोरोना तपासणी करण्यात आली. यावेळी त्याचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. सध्या 170 पॉझिटीव्ह रुग्ण सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयात उपचार घेत असल्याचे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ विद्याधर गायकवाड यांनी सांगितले.


कोरोनाग्रस्त कर्मचा-यावर उपचार सुरू आहेत. तसेच कार्यालयाच्या सर्व विभागात औषध फवारणी करण्यात आली आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचारी यांना वर्क फ्रॉम होमच्या सूचना दिलेल्या आहेत.
- अमित कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात पुन्हा हिट अँड रन; पाषाण परिसरात भरधाव कारची महिलेला धडक; जागीच मृत्यू

Nashik Farmers Protest : नाशिकमध्ये धडकले ‘लाल तुफान’; वनहक्क आणि पाणीप्रश्नासाठी हजारो शेतकरी एकवटले!

Latest Marathi news Live Update: पुण्यात नगरसेविकेच्याच भावावर हल्ला

Sangli ZP Election : सांगलीत झेडपीचे वातावरण तापलं उमेदवाराच्या पतीवर प्राणघातक हल्ला, गाडी जाळली; पहाटे ३ वाजता जयंत पाटील घटनास्थळी

आजारी पत्नीला उपचाराला न्यायला पैसे नव्हते, ७० वर्षीय वृद्धाचा सायकल रिक्षाने ६०० किमी प्रवास

SCROLL FOR NEXT