Pune-University 
पुणे

विद्यार्थ्यांनो, आता 'एन्ट्रान्स एक्झाम'च्या तयारीला लागा; पुणे विद्यापीठातर्फे वेळापत्रक जाहीर!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदवी, पदवी, पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेसाठी १ जूनपासून (सोमवार) ऑनलाईन अर्ज उपलब्ध होणार आहेत. अर्ज भरण्यासाठी अंतिम तारीख ३० जून आहे. विद्यापीठाने याबाबत शनिवारी (ता.३०) परिपत्रक प्रसिद्ध केले. त्यात प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले.

'कोरोना'मुळे पुणे विद्यापीठाच्या परीक्षा खोळंबल्या आहेत, त्याचे नियोजन सुरू असतानाच आता पुढील वर्षाचे नियोजनही करावे लागत आहे. पुणे विद्यापीठातील अभ्यासक्रमाला प्रवेश मिळावा यासाठी महाराष्ट्रातील ग्रामीण भागासह देश, विदेशातील विद्यार्थी परीक्षा देतात. 

विद्यापीठात पदव्युत्तर पदवी, पदवी, इंटिग्रेटेड कोर्स असे सुमारे ९० अभ्यासक्रमांचे शैक्षणिक विभाग आहेत. या अभ्यासक्रमांसाठी १०० गुणांची प्रवेश परीक्षा घेतली जाते. त्यात २० गुण हे सामान्य ज्ञानावर असतात. उर्वरित गुण अभ्यासक्रमाशी निगडीत विषयांवर असतात.

या प्रवेश परीक्षा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येणार आहे. त्याचा निकाल विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाणार आहे. यासाठी खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांना ५०० रुपये शुल्क तर मागासप्रवर्ग गटातील विद्यार्थ्यांसाठी ३५० रुपये शुल्क आहे. शुल्क ऑनलाईनच भरावे लागेल.

पदव्युत्तर पदविका व प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे ७७ विभाग आहेत, त्यांच्यासाठीही प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. पात्र विद्यार्थ्यांना अर्ज करताना मागील वर्षाची उत्तीर्णतेची गुणपत्रिका, जातीचा दाखला, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र याचे फोटोकॉपी अपलोड करावे लागेल. दिव्यांग विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्‍यक आहे. प्रवेश परीक्षेसाठी लिंक : https://campus.unipune.ac.in/ccep/login.aspx

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

J&K Bus Accident : जम्मू-काश्मीरमध्ये खोल दरीत बस कोसळली; 4 जवान ठार, ३१ जखमी

Mukesh Ambani यांनी खरेदी केलं १००० हून अधिक कोटीचं विमान; देशात असं Jet कोणाकडेच नाही; काय आहे खास?

Mumbai News: भर रस्त्यात महिलेला प्रसूतीकळा; ताडपत्री अन् बॅनरच्या मदतीने पोलिसांनी साधलं प्रसंगावधान

Yashasvi Jaiswal ने सुनील गावसकरांचा विक्रम मोडला, सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंगतीत जाऊन बसला

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT