Online fraud of seventeen and half Lakhs by lottery excuse 
पुणे

पुण्यात लॉटरीच्या बहाण्याने साडे सतरा लाखाची ऑनलाईन फसवणूक 

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ऑनलाईन शॉपिंग करताना सेवानिवृत्त नागरिकास साडे बारा लाख रुपयांची लॉटरी लागल्याचे सांगून एका नागरिकास तब्बल साडे सतरा लाख रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी शुक्रवार पेठेत राहणाऱ्या 59 वर्षीय नागरीकाने फिर्याद दिली आहे. त्यावरुन अनोळघी मोबाईलधारक व बँकेचा खातेदार अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ऑगस्ट 2017 ते मे 2019 या कालावधीमध्ये घडली.

पिंपरीत पतीनेच दिली अॅसिड फेकून पत्नीला जिवे मारण्याची धमकी 

वरिष्ठ पोलिस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सेवानिवृत्त नागरीक आहेत. त्यांची मुलगी नापतोल या ऑनलाईन शॉपिंगच्या वेबसाईटवरुन काही वस्तुंची खरेदी करीत होते. त्यावेळी त्यांना 12 लाख 80 हजार रुपयांची लॉटरी लागल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर फिर्यादी यांच्याशी वेळोवेळी मोबाईलद्वारे संपर्क साधून त्यांना बक्षिसाची रक्कम मिळण्यासाठी विविध प्रकारच्या प्रक्रिया पुर्ण करण्याचे कारण सांगून त्यांना बँक खात्यामध्ये रक्कम भरायला सांगितली. त्यांच्याकडून सातत्याने 17 लाख 54 हजार 750 रुपये इतके रुपये अनोळखी व्यक्तीने ऑनलाईन भरण्यास भाग पाडले. त्यानंतर त्यांनी बक्षिसाची रक्कम मिळण्यासाठी अनोळखी व्यक्तींशी संपर्क साधला. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) आर.एस.राजमाने करीत आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT