CM-Uddhav-Thackeray 
पुणे

पुण्यातील 'जम्बो हॉस्पिटल'चा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार 'श्रीगणेशा'!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोनाच्या रुग्णांवर 'इलाज' करण्यासाठी उभारलेल्या मात्र, मुहूर्तावरून चर्चेत आलेल्या जम्बो कोविड केअर सेंटरचा 'श्रीगणेशा' रविवारी (ता.२३) होणार असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दुपारी चार वाजता सेंटरचे ऑनलाइन उद्घाटन होणार आहे. त्यानंतर तेथील सेवा-सुविधांची चाचणी पूर्ण होताच रुग्णांना दाखल घेतले जाणार आहे. सेंटरमध्ये आठशे रुग्णांवरील उपचाराची व्यवस्था आहे. 

मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सेंटरचे उद्घाटन होईल. त्यासाठी शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) आवारात छोटेखानी कार्यक्रम होणार आहे. तेव्हा महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल उपस्थिती राहतील. 

कोरोनाच्या रुग्णांना वेळेत तेही नेमके उपचार देण्याच्या उद्देशाने 'सीओईपी'च्या आवारात हे सेंटर उभारले असून, त्याठिकाणी सहाशे ऑक्‍सिजन आणि दोनशे अतिदक्षता विभाग (आयसीयू) बेडची सोय आहे. या सेंटरचे बहुतांशी काम आटोपले आहे. मात्र, शेवटच्या टप्प्यातील तपासण्या करण्यात येत आहेत. त्यानंतर प्रत्यक्षात उपचार सुविधा सुरू होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

दरम्यान, १९ ऑगस्टपासून सेंटर सुरू करण्याच्या सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्थानिक प्रशासनाला दिली. परंतु, त्या मुदतीत ते शक्‍य झाले नाही. त्यावरून भाजपने आंदोलनाचा पवित्रा घेतला; तेव्हा मात्र २४ ऑगस्टपासून सेंटर सुरू करण्याचे आश्‍वासन खासदार गिरीष बापट यांना दिले होते. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM : भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम, आता फक्त वेस्ट इंडिजचा अडथळा! दक्षिण आफ्रिकेचा Semi Final प्रवेश पक्का

Thane: भिवंडीच्या विकासाला नवी दिशा! घराणेशाहीला नकार; बदलाच्या राजकारणाला मतदारांची साथ, काँग्रेसचा शिलेदार उपमहापौरपदी विराजमान

Teacher Recruitment: महाराष्ट्रात शिक्षकांची भरती कधी होणार? निवृत्ती वयाबाबत मोठं वक्तव्य करत शिक्षण मंत्र्यांनी तारीखच सांगितली!

IND vs ZIM, T20 WC: अभिषेक शर्माला सूर गवसला, भारताने उभारली वर्ल्ड कपमधील सर्वोच्च धावसंख्या; २००७ चा विक्रम मोडला

Khamgaon Crime : सख्ख्या भावाचा खून करून मृतदेह जाळला व राख फेकली नदीत; राहुड येथील घटना, दोन्ही आरोपीस अटक

SCROLL FOR NEXT