Blood-Bank 
पुणे

पुण्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रक्ताचाही तुटवडा वाढला

सकाळवृत्तसेवा

पुणे - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षापासून रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा वाढला आहे. सार्वजनिक रक्तदान शिबिराच्या संख्येत होत असलेली घट यामुळे आता शहरात पुन्हा रक्ताची कमतरता भासत असल्याचे रुग्णालय आणि रक्तपेढ्यांच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे. तसेच नागरिकांनी रक्तपेढ्यांमध्ये जाऊन रक्तदान करावे असे आवाहन सुद्धा करण्यात येत आहे. 

गेल्यावर्षी लॉकडाउनमुळे सर्व काही बंद होते. परिणामी २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये रक्तदान शिबिरांमध्ये निम्म्याहून अधिक घट झाली होती. तसेच संसर्गाचा भीतीमुळे नागरिक रक्तदानासाठी बाहेर पडत नवते. त्यामुळे इतर रुग्णांच्या उपचारासाठी रक्ताची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

जनकल्याण रक्तपेढीचे संचालक डॉ. अतुल कुलकर्णी म्हणाले, ‘‘सध्या आम्हाला दर महिन्याला १५०० ते १८०० रक्त पिशव्यांची नितांत आवश्यकता आहे. ती उपलब्ध होण्यासाठी गेल्या वर्षीप्रमाणेच सामाजिक संस्था, सोसायट्या, वित्तीय संस्था, शाळा कॉलेजचा स्टाफ या माध्यमातून रक्तदान शिबिरे होणे आवश्यक आहे. अशाच शिबिरातून दर महिन्याची रक्ताची तजवीज करणे शक्य होणार आहे. या संकलनामुळे रुग्णांचे प्राण वाचविणे शक्य होईल.’’

रक्ताचा असा झाला पुरवठा (जनकल्याण रक्तपेढीची आकडेवारी)
आजार                                           रुग्णसंख्या
रक्तक्षय (अ‍ॅनिमिया)               ३२१७
अप्लास्टिक अ‍ॅनिमिया               १४८
कर्करोग                               ३५०
मूत्रपिंडाचे आजार               १८२
क्रॉनिक किडनी फेल्युअर (सीआरएफ)           ६५
प्रसूती                              ५६५
डेंग्यू                              १९८८
डायलिसिस                               ५३०
ब्लिडिंग                               ६८
हिमोफिलिया                              ३२
हिस्टरेक्टॉमी (गर्भाशय काढणे)              ६८
अपघात                              ८०
शस्त्रक्रिया                             ३२५५
थॅलसेमिया                            १७३१
इतर                            १९२९

लसीकरणानंतर २८ दिवस नागरिकांना रक्तदान करता येणार नाही. तर वाढती रुग्णसंख्या पाहता पुढील २ ते ३ महिने पुरेल या अनुषंगाने जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावे. यासाठी लसीकरणाच्या आधी रक्तदान करावे. 
- डॉ. अतुल कुलकर्णी, संचालक, जनकल्याण रक्तपेढी

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK, Asia Cup: भारतच ठरला 'बॉस', पाकिस्तानच्या ठेचल्या नांग्या; कर्णधार सूर्यकुमारचं वाढदिवशी भारतीयांना स्पेशल गिफ्ट

IND vs PAK, Asia Cup: अरर! पाकिस्तानच्या राष्ट्रगीतापूर्वी अचानक मैदानात वाजलं 'जलेबी बेबी'; Video तुफान व्हायरल

Vijay Vadettiwar: आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांकडून बनवाबनवी: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांची टीका; लढा देण्याचा निर्धार

IND vs PAK: अक्षरच्या गोलंदाजीवर मोठा शॉट मारायला गेला पण…; शानदार झेल घेत तिलकने झमानला दाखवला ‘शॉर्टकट टू पॅव्हेलियन’, पाहा व्हिडिओ

Minister Nitin Gadkari: पाणी व्यवस्थापनाने शेतकरी ऊर्जादाता: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी; नाम फाउंडेशन दशकपूर्तीनिमित्त कार्यक्रम

SCROLL FOR NEXT