Partial lockdown is required until the drug arrives for coronaVirus 
पुणे

Corona Virus : औषध येईपर्यंत अंशतः लॉकडाऊन आवश्‍यक 

सम्राट कदम

पुणे : विषाणूजन्य आजारांचा संसर्ग केवळ औषध किंवा व्यक्तीची प्रतिकारशक्तीच (हर्ड इम्युनिटी) रोखू शकते. अशा परिस्थितीत आपण फक्त प्रसाराला पायबंद घालण्यासाठी आवश्‍यक उपाययोजना करु शकतो. सध्यातरी औषध येईपर्यंत पूर्ण किंवा अंशतः लॉकडाऊन शिवाय पर्याय नसल्याची माहिती, इंग्लंडच्या केंब्रिज विद्यापीठातील सेंटर फॉर मॅथेमॅटीकल सायन्सेसचे डॉ.राजेश सिंग यांनी दिली. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
देशातील कोरोना प्रसार रोखण्यासाठी 49 दिवसांचा लॉकडाऊन आवश्‍यक असल्याचे संशोधन डॉ. सिंग आणि डॉ.आर. अधिकारी यांनी मांडले होते. "आर्काईव्ह'या शोधपत्रिकेत प्रकाशित झालेल्या या शोधनिबंधावर "सकाळ'मध्ये बातमी प्रकाशित झाली होती. आजच्या पार्श्‍वभूमीवर त्यांच्याशी संवाद साधले असता त्यांनी ही माहिती दिली.

Coronavirus : 'शांताबाई' फेम संजय लोंढे यांच्यासह लोककलावंतांना महिनाभराचा धान्यसाठा

डॉ. सिंग म्हणाले,"भारतातील 25 मार्चपर्यंतच्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीवर आम्ही हे निरीक्षणे मांडली होती. परंतु, काही नागरिकांचा बेजबाबदारपणा आणि तबलिगी प्रकरणामुळे अजूनही बाधीतांच्या संख्येच्या दरामध्ये वाढ होत आहे. संख्या जरी नियंत्रणात आली तरी प्रसार रोखण्यासाठी आवश्‍यक त्या सर्व गोष्टी आपल्याला कराव्या लागतील.''लोकसंख्येच्या घणतेचा विचार करता देशातील नागरिकांनी सामाजिक अंतर पाळणे गरजेचे असल्याचे डॉ. सिंग यांनी नमूद केले. सरकारने आर्थिक बाजूंचा विचार करून लॉकडाऊन संदर्भात योग्य निर्णय घ्यावा असेही संशोधकांनी म्हटले आहे. 

- सूर्याच्या UV Rays मुळे कोरोना बरा होतो ?  जाणून घ्या व्हायरल सत्य असत्य 

- बाधितांपेक्षा मृतांचा आकडा बोलका.. 
देशात अजूनही संशयित किंवा बाधितांच्या निकटवर्तीयांचीच कोरोना विषाणूची चाचणी होत आहे. त्यामुळे बाधितांची निश्‍चित आकडेवारीसमोर येत नाही. त्यापेक्षा मृतांचा आकडा बरच काही सांगतो आहे. पुणे आणि मुंबईसारख्या महानगरांत मृतांची टक्केवारी सध्यातरी 8 ते 10 दरम्यान आहे. जगाच्या तुलनेत ही संख्या जास्त आहे. त्यावरूनच तेथील परिस्थितीचे गांभीर्य आपल्या लक्षात येते. 

 आणखी वाचा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आमदार होण्याचा मार्ग मोकळा

- पहिली आणि तिसरी पिढी महत्त्वाची 
जगभरात विभक्त कुटुंबपद्धती आहे. त्यामुळे घरात एकाच वेळी आजी-आजोबा आणि नातवंडे राहतातच असे नाही. भारतात तीनही पिढ्या एकाच कुटुंबात राहतात. त्यामुळे तरुणांकडून नातवाला किंवा आजी-आजोबांना संसर्ग होण्याची शक्‍यता तर आहेच, पण त्याचबरोबर जीविताची धोकाही वाढत असल्याचे शोधपत्रिकेत नमूद आहे. 

- युरोपची ही चूक झाली 
युरोपातील काही देशांनी सुरवातीला व्यक्तीची वैयक्तिक प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी कोरोनाचा प्रसार रोखला नाही. जो पर्यंत औषध नाही तो पर्यंत ही प्रतिकारशक्ती (हर्ड इम्युनिटी) जास्त प्रभावी ठरेल असा त्यांचा विचार होता. परंतु, ही योजना काही कामात आली नाही. उलटे याचे गंभीर परिणाम भोगावे लागले आहेत. 

- 21-28-18चा फॉर्म्युला 
सलग लॉकडाऊन शक्‍य नसल्यास 21 दिवसांनंतर नागरिकांना थोडा वेळ देऊन पुन्हा 28 दिवसांचा लॉकडाऊन आणि त्यानंतर पुन्हा ढिल देऊन 18 दिवसांचा लॉकडाऊन करण्याची सूचनाही शोधनिबंधात नमूद करण्यात आली आहे. चाचण्याचा वेग वाढविण्याबरोबरच आर्थिक गोष्टींचा विचार लॉकडाऊनमध्ये करायला हवा. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: तुमचा अभिमान! शुभमन गिल पराभवानंतर काय म्हणाला? सामना नेमका कुठे फिरला हे सांगितलं, जसप्रीतबाबत...

Video: सर्वच सीमा ओलांडल्या! फेमस होण्यासाठी बाईकवर जोडप्याचं नको ते कृत्य, लोकांनी व्हिडिओ बनवून व्हायरल केला

IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराज दुर्दैवी पद्धतीने बाद झाला, रवींद्र जडेजा हतबल दिसला; इंग्लंड तिथेच जिंकला Video

Mhada Lottery: मुंबईकरांना म्हाडाकडून आनंदवार्ता! ५ हजारहून अधिक घरांची लॉटरी जाहीर; 'असा' करा अर्ज

ENG vs IND, 3rd Test: जडेजा लढला, पण इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी जिंकली! १९३ धावा करतानाही भारताची उडाली भंबेरी

SCROLL FOR NEXT