supriya_sule
supriya_sule 
पुणे

कुलकर्णी दांपत्याचा फुटला अश्रूंचा बांध...म्हणाले, "सुप्रिया सुळे यांच्यामुळे...' 

धोंडिबा कुंभार

पिरंगुट (पुणे) : लॉकडाउनमुळे तब्बल 55 दिवस आईवडिलांपासून परजिल्ह्यात अडकून पडलेल्या दोन मुलांची भेट खासदार सुप्रिया सुळे यांनी घडवून आणली आणि मातापित्यांसह मुलांच्याही आनंदाश्रूंचा बांध फुटला. त्यासाठी तीन ताईंनी मोलाची मदत व उपकार केल्याची कृतज्ञताही या आईवडिलांनी "सकाळ'कडे व्यक्त केली. 

मुळशी तालुक्‍यातील पिरंगुट येथील रहिवासी राजकुमार कुलकर्णी यांच्या पत्नी राधिका या लॉकडाउन सुरू होण्यापूर्वी म्हणजे 13 मार्चला थोरला मुलगा रुपम व धाकटा अथर्व यांच्या लातूर येथे माहेरी गेल्या होत्या. सुटी सुरू झाल्याने मुलांनी आजोळी आजीकडे राहण्याचा हट्ट धरला. त्यांना तेथे ठेवून राधिका या लगेचच पिरंगुटला माघारी आल्या. मात्र, लॉकडाउन वाढतच चालल्याने मुलांना आईवडिलांची ओढ तीव्र होत गेली. पिरंगुटला येण्यासाठी त्यांचा जीव कासावीस होऊ लागला. इकडे पिरंगुटला राजकुमार आणि राधिका यांना तर मुलांच्या ताटातुटीने जीव गुदमरून जात होता. अनेक वेळा रात्ररात्र झोप येत नसायची. 

मुलांना घेऊन येण्यासाठी पोलिसांच्या लिंकवर त्यांची सलग तीनवेळा परवानगी नाकारली गेली. मग मात्र त्यांचा धीर खचू लागला. राजकुमार यांनी आंदगावचे संजय मारणे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या भोर विधानसभेच्या महिला अध्यक्षा उज्ज्वला मारणे व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शांताराम इंगवले यांच्याशी संपर्क साधला. उज्ज्वला मारणे व इंगवले यांनी थेट सुप्रिया सुळे यांच्या कार्यालयातील रश्‍मी कामतेकर यांच्याशी संपर्क केला. रश्‍मी यांनी कुलकर्णी यांना धीर दिला आणि सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून तुम्हाला तातडीने पास मिळवून देण्याचे आश्वासनही दिले. विशेष म्हणजे रश्‍मी यांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता करून दुसऱ्याच दिवशी कुलकर्णी यांना पास मिळवून दिला. दोन्हीही मुले पिरंगुटला येताच आई राधिका आणि वडील राजकुमार यांनी आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा  

"ताई देवासारख्याच धावून आल्या...' 
याबाबत राजकुमार कुलकर्णी म्हणाले, ""उज्ज्वलाताई, रश्‍मीताई आणि सुप्रियाताई या तीन ताईंनी माझ्यावर फार मोठे उपकार केले आहेच. आमचा धीर सुटत चालला होता. रात्ररात्र झोप लागत नव्हती. मुलांनी तिकडे आकांडतांडव सुरू केलेले. मग आणखीनच आमचीही मानसिकता खचत गेली होती. पण, सुप्रियाताईंनी आमच्यावर केलेले उपकार खरंच आयुष्यभर आम्ही विसरू शकणार नाही. या तीन ताई आमच्यासाठी देवासारख्याच धावून आल्या आणि आम्हाला आमची मुले मिळाली.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', चेन्नईच्या थालावर भडकला मुंबईचा माजी कर्णधार

Latest Marathi News Update : झारखंडमध्ये ईडीचे छापे, मंत्र्याच्या कर्मचाऱ्याकडून करोडोंची रोकड जप्त

Bajrang Punia : नाडाकडून बजरंग पुनिया निलंबित नमुना; चाचणीला नकार,कुस्ती संघटना ‘वाडा’शी संपर्क साधणार

Aerobic Exercise : वजन कमी करण्यासाठी घरच्या घरी करा ‘हे’ एरोबिक व्यायाम प्रकार, मानसिक अन् शारिरीक आरोग्य राहील तंदूरूस्त

Pune News : क्रिकेटच्या चेंडूने घेतला होतकरू खेळाडूचा बळी! अवघड जागी चेंडू लागल्यामुळे ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यु

SCROLL FOR NEXT