PMC administration claims that there Improvements in jumbo covid center in pune 
पुणे

होय, पुण्यातील 'जम्बो' कोविड सेंटरमध्ये होतेय सुधारणा !

सकाळवृत्तसेवा

पुणे : अव्यवस्थेमुळे चर्चेत आलेल्या पुण्यातील जम्बो हॉस्पिटलमध्ये आता  सुधारणा होऊ लागली आहे. विविध सुविधांचा अभाव असल्याने जम्बोतील रुग्ण इतर हॉस्पिटलमध्ये हलवण्याची आवश्यकता गेल्या या सात दिवसांमध्ये भासली नसल्याचा दावा आता महापालिका प्रशासनाने केला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटरची कमतरता, डॉक्टरांची वानवा तसेच भोजनापासून अनेक असुविधांमुळे जम्बो हॉस्पिटल चर्चेत आले होते. या हॉस्पिटलमध्ये तातडीने सुधारणा करण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, पालकमंत्री अजित पवार यांनी बैठक घेऊन प्रशासनाला धारेवर धरले होते. जम्बोचा कारभार पाहणाऱ्या संस्थेची त्यानंतर हकालपट्टी करण्यात आली. सध्या महापालिकेच्या नियंत्रणाखाली जम्बोचे कामकाज सुरू असून, त्यात सुधारणा झाली असल्याचे पालिकेने म्हटले आहे.

"जम्बो कोविड रुग्णालयात अधिक सक्षमपणे सुविधा पुरवून रुग्णांची संपूर्णपणे देखभाल करण्यात येत आहे. याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. अधिक सुविधांच्या गरजेपोटी जम्बो सेंटरमधील रुग्ण इतर रुग्णालयांत हलविण्याची आवश्यकता मागील सात दिवसात एकदाही भासलेली नाही. म्हणजे वैद्यकीय सल्ल्याने इतरत्र नेण्यासाठी डिस्चार्ज (Discharge Against Medical Advice- डामा डिस्चार्ज) देण्याची गरज आठवड्यात एकदाही भासलेली नाही, " असे अतिरिक्त मनपा आयुक्त व जम्बो सेंटरच्या कार्यकारी अध्यक्षा रुबल अग्रवाल यांनी सांगितले. 

महत्त्वाची बातमी : पुणे जिल्ह्यातील `हा` भाग उद्यापासून सात दिवस राहणार बंद 

‘जम्बो’मध्ये उपचार घेऊन बरे झालेल्या 14 रुग्णांना गुरुवारी घरी सोडण्यात आले. तसेच, शुक्रवारी 26 नवीन रुग्णांना प्रवेश देण्यात आला. गुरुवारपासून येथे प्रवेश देण्यास सुरुवात करण्यात आली असल्याच अग्रवाल यांनी सांगितले.


दरम्यान, येथे आजपासून पाच आयसीयू, तर पाच व्हेंटिलेटर बेड तयार करून कार्यान्वित करण्यात आले. जम्बो कोविड रुग्णालयाची यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासन पाऊले उचलत आहेत याचा सकारात्मक परिणाम येथील सेवेत दिसत आहे. रुग्ण आणि यांच्यातील संवाद वाढावा यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे , त्यानुसार 31 नातेवाईकांनी रुग्णांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. त्यामुळे रुग्णांचा अधिक चांगला प्रतिसाद मिळत आहे.

या झाल्या सुधारणा

- सात दिवसांत जम्बोतून एकही रुग्ण इतरत्र नेण्याची गरज भासली नाही

- 26 नवीन करोना रुग्णांना प्रवेश

- 5 व्हेंटिलेटर, 5 ICU बेड तयार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

Record Breaking : १० चौकार, १२ षटकार! ३५३ च्या स्ट्राईक रेटने शतक; ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भीमपराक्रम, २९ धावांत ९ गेल्या तरी संघ जिंकला

Latest Marathi News Updates : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लखनौमधील बडी काली मंदिराला दिली भेट

SCROLL FOR NEXT