Corona-Virus-Death 
पुणे

खबरदार! कोरोना मृतांवरील अंत्यसंस्काराला विरोध कराल तर...!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोना व्हायरसमुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार (दहन किंवा दफन) करण्याला विरोध करणाऱ्यांना धडा शिकविण्याची भूमिका महापालिका प्रशासनाने बुधवारी (ता.६) घेतली आहे.

कोरोनाबद्दल गैरसमज करून आपल्या भागांतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याला विरोध करणारे लोकप्रतिनिधी आणि नागरिकांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे मृतांवरील अत्यंसंस्काराच्या मार्गातील अडथळे दूर झाली आहेत. 

पुणे शहरात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढली असून, आतापर्यंत 111 जणांचा जीव घेतला आहे. मात्र, हे मृतदेह ताब्यात घेण्यापासून त्यावरील अत्यंसस्कारावरून गैरसमज निर्माण झाले आहे. त्यामुळे अगदी मृतांच्या नातेवाइकांपासून महापालिकेच्या आरोग्य खात्यातील कर्मचारीही पुढे येत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

काही दिवसांपूर्वी येरवड्यातील एका कुटुंबातील नातेवाइकांनी मृतदेह घेणार नसल्याच्या मुद्यांवरून महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी वादही घातला होता. एवढेच नव्हे, अशा मृतदेहांवर आपल्या भागांतील स्मशानभूमीत अत्यंसंस्कार (दहन किंवा दफन) करू नये, असा आग्रह स्थानिक नागरिक घेत आहेत; तर काही लोकप्रतिनिधीही उघडपणे विरोध करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनापुढे अडचणी उभ्या ठाकल्या होत्या.

या पार्श्‍वभूमीवर अत्यंसंस्कारात हस्तक्षेप करणाऱ्यांविरोधात फौजदारी कारवाई करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या सहायक आरोग्य प्रमुख डॉ. कल्पना बळीवंत यांनी आयुक्तांपुढे ठेवला होता. तो मंजूर करण्यात आला आहे. 

डॉ. बळीवंत म्हणाल्या, ''कोरोना रुग्णांच्या मृतदेहांवर दोन ते अडीच तासांत अत्यंसंस्कार झालेच पाहिजेत. परंतु, सध्या या रोगाबाबत गैरसमज असल्याने अत्यंसंस्काराला विरोध होत आहे. त्यामुळे लोकांचा हस्तक्षेप कमी करण्यासाठी कठोर पावले उचलली जाणार आहेत.''

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime : मुंबईत वन्यप्राण्यांची तस्करी उघड? जुहूत घरातून जिवंत मगरीसह कासव जप्त; २९ वर्षीय इम्रान शेख पोलिसांच्या ताब्यात

Viral Video: हायवेवर थरारक स्टंट करत होती ताई, पण क्षणात घडले असं काही की व्हिडिओ पाहून धक्का बसेल

Kolhapur Mayor Results : कोल्हापुरात महायुतीचा दबदबा! महापौरपदी भाजपच्या रुपाराणी निकम, तर उपमहापौरपदी अक्षय जरग यांची बाजी; काँग्रेसचा पराभव

चार दिवसांत पत्नी गर्भवती कशी राहू शकते? आर्मीत असलेल्या पतीची थेट हायकोर्टात धाव, नेमकं प्रकरण काय?

Canada Work Permit Rules: कॅनडामध्ये नोकरी करायची आहे? मग 'ही' चूक करू नका, नाहीतर देश सोडावा लागेल...

SCROLL FOR NEXT