कोथरुड : ''पौडरस्त्यावरील राजा शिवराय प्रतिष्ठान शाळेनजीक असलेल्या पादचारी भुयारी मार्गात आठ दुकाने बांधली आहेत. गेल्या सहा वर्षे झाले या दुकानांचे वाटप न झाल्याने महापालिकेचे लाखो रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. या दुकानांचे वाटप महिला बचत गट, दिव्यांग, छोटे व्यावसायिक यांना तत्काळ करुन त्याचा वापर सुरु करावा'' अशी मागणी काँग्रेस कार्यकर्ते हरीभाऊ सणस यांनी केली आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळाने मार्च 2016 मध्ये या आठही गाळ्यांची मागणी केली होती. त्यावेळी प्रत्येक गाळ्यासाठी मासिक 16831 रुपये भाडे असावे असे पत्र शहर अभियंता कार्यालयाने मालमत्ता व व्यवस्थापन विभागाला दिले होते. हा भुयारी मार्ग बांधुन पूर्ण झाल्यावरही उद्घाटनासाठी माननीयांची तारीख न मिळाल्याने वापरला जात नव्हता. जयभवानीनगरमधील रहीवाशांनी आम्ही कुलुप तोडून आमच्याच हस्ते भुयारी मार्ग सुरु करणार असा इशारा दिल्यावर 26 जानेवारी 2016 रोजी हा मार्ग वापरावयास सुरुवात झाली. मात्र दुकाने कोणाला द्यायची या वादात अद्याप पर्यंत दुकानांचे वाटपच झाले नाही. त्यामुळे या दुकानाच्या भाड्यापोटी मिळू शकणाऱ्या लाखो रुपयांच्या महसुलाला पालिका मुकली आहे.
हे वाचा - पॅन कार्डला आधारशी जोडा नाहीतर, १ हजार रुपयांचा दंड!
हरीभाऊ सणस म्हणाले, ''गाळ्यांचे वाटप गरजूंना केल्यास त्यातून महापालिकेला निश्चित असे उत्पन्न मिळू शकते. परंतु स्थानिक राजकारण, माननीयांचे दुर्लक्ष, जागा कोणाला द्यायची या वादातून वाटप रेंगाळते. त्यामुळे तुला ना मला, घाल कुत्र्याला अशी परिस्थिती होते.''
'जयभवानीनगर मधील आम्ही महिला बचत गटाच्या माध्यमातून घरगुती खाद्यपदार्थ तसेच गृहोपयोगी वस्तूंची विक्री करतो. महिला बचतगटांना त्यांची उत्पादने विक्री करण्यासाठी असे गाळे मिळाल्यास महिला सक्षमीकरणास मदत होईल.
- अनिता चव्हाण
''कोरोनामुळे शाळा बंद आहेत. दुकानांचे वाटप नसल्याने या मार्गावर तसा शुकशुकाटच असतो. सुरक्षा रक्षक नसल्याने मुली व महिला या मार्गाचा वापर टाळतात. येथील निर्जनतेचा गैरफायदा घेत काही युवक-युवती येथे अश्लील चाळे करत असतात. हा प्रकार लक्षात आल्यावर आम्ही त्यांना योग्य समज देवून येथील गैरप्रकार थांबवले. सध्या या भुयारी मार्गातील भिंतीवर रंग रंगोटीचे काम सुरु आहे. येथील व्यावसायिक गाळ्यांचे वाटप त्वरीत करावे म्हणजे या मार्गाचा वापर वाढेल व पालिकेलाही महसूल मिळेल. गैरप्रकार देखील थांबतील.''
- प्रा. सागर शेडगे
''गाळे वाटपाचे काम भूमी जिंदगी विभागचे आहे. मी त्यांना त्याविषयी सुचना देतो
- श्रीनिवास बोनाला, मुख्य अभियंता प्रकल्प, पुणे मनपा
- बँकांची कामे दोन दिवसात उरकून घ्या; शनिवारपासून ७ दिवस बँका राहणार बंद
''गाळ्यांचे भाडे परवडत नसल्याने महापालिकेचे गाळे पडून राहतात. असा अनुभव आम्हाला राजीव गांधी मार्केट यार्ड बाबत आला आहे. त्यामुळे भुयारी मार्गातील गाळ्यांच्या भाड्यासंदर्भात धोरण ठरवण्याचा विचार आम्ही करत आहोत. समाज विकास विभाग, अतिक्रमण विभाग आदींच्या उपयोगासाठी हे गाळे देता येवू शकतील. प्रकल्प विभागाने हे गाळे आमच्याकडे हस्तांतर केलेले नाहीत. गाळ्यांचे हस्तांतर झाल्यावर आम्ही टेंडर काढून त्याचे वाटप करु.''
- राजेंद्र मुठे (उपायुक्त मालमत्ता व व्यवस्थापन विभाग पुणे मनपा)
- अर्थविश्वातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.