लोणी काळभोर (पुणे) : जिल्हा पोलिस बेकायदा वाळू वाहतूक व उत्खनन करणाऱ्या माफियांच्या विरोधात चांगलेच आक्रमक झाले आहेत. लोणी काळभोर पोलिसांनी मागील तीन दिवसांच्या कालावधीत बेकायदा वाळूची वाहतूक करणाऱ्या नऊ ट्रकवर कारवाई करुन, ट्रकसह सुमारे पन्नास लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे, तर नऊ जणांना अटक केली आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी दोनच दिवसांपुर्वी शिंदवणे (ता. हवेली ) येथे सुरू असलेल्या वाळू वॉशिंग सेंटरवर छापा टाकलेली कारवाई ताजी असतानाच, पोलिसांनी मंगळवारी (ता. १३) मध्यरात्री पुणे-सोलापूर महामार्गावरील थेऊरफाट्यावर अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या तीन ट्रकवर कारवाई करुन, शहाजी सिताराम चव्हाण (वय ३५, रा. चंदनवाडी, ता. दौड), श्यामराव रूस्तुम जाधव (वय ३२, रा. कोढवा ता. हवेली) व राजेंद्र आसाराम पावसे (वय ४५, रा.वाखारी ता. दौड) या तीन ट्रकचालकांना अटक केली आहे. तर वरील तिघांच्याकडून तीन ट्रकसह सुमारे तेरा लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी शिंदवणे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील वाळू वॉशिंग सेंटरवर छापा घालून वाळृूचे दोन ट्रक तर त्याच रात्री पुणे-सोलापुर महामार्गावरून वाहतूक करणारे चार ६ ट्रक व वाळू असा एकूण ३५ लाख ८४ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला होता. या कारवाईत पोलिसांनी पोपट देवराम महाडीक व अविनाश मोहन महाडीक (दोघे रा. शिदवणे ता. हवेली), अभिजित ऊर्फ महावीर श्रीमंत काकडे या तिघांच्यासह गणेश विठ्ठल गायकवाड (वय ३९, रा. सिद्धटेक गणपती, ता. कर्जत ), परमेश्वर अंकुश सरडे ( वय ३८, रा. भांडगांव, ता. दौंड ), पप्पू धोंडीराम राठोड ( वय २५, रा. गिरीम, ता. दौड ) व मुकुंद पंडीत डोईफोडे ( वय २६, रा. आंबेगांव बुद्रुक, ता. हवेली ) या सहा जणांना अटक केली होती.
वाळूमाफियांचे धाबे दणाणले- अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या आदेशानुसार पोलिसांनी बेकायदा वाळू वाहतुक करणाऱ्या ट्रक चालकाबरोबरच, ट्रकमालकांवरही पर्यावरण संरक्षण कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यास सुरुवात केली आहे. वाळूला सोन्याचा बाजारभाव मिळत असल्याने, जिल्हामधील सर्वच वाळूमाफियांनी मिळेल तेथून वाळू चोरण्याचा सपाटा लावला आहे. वाऴू माफियांविरोधात लोणी काळभोर पोलिसांनी कारवाईस वेग दिला आहे. यापुढील काळात वाळू वाहतुकीच्या विरोधातील कारवाईला आणखी वेग देण्यात येणार असल्याची माहिती लोणी काळभोरचे पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.