The police said that the death of the patient in pune was due to the irresponsibility of the ambulance.jpg 
पुणे

खाकी वर्दीचा अॅप्रनवर पलटवार; पण 'त्या' रुग्णाचा जीव परत येणार नाही!

सकाळवृत्तसेवा

पुणे : रुग्णाचे प्राण वाचविण्याची पोलिसांनी शेवटच्या क्षणापर्यंत कसोशिने प्रयत्न केला. पण, त्याला 108 आपत्कालीन रुग्णवाहिकेने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाला. असा पलटवार खाकी वर्दीने पांढऱ्या अॅप्रनवर केला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

''नाना पेठेतील मध्यरात्री रुग्णवाहिका न मिळाल्याने रुग्णाचा मृत्यू झाला. या प्रकरणी 108ची रुग्णवाहिका घटनास्थळावर पोचली होती. पण, ज्या पोलिसांनी 108च्या कंट्रोल रूमशी संपर्क साधला होता. त्यांचा फोन लागला नाही. त्यामुळे नाना पेठेत रुग्णाचा नेमका पत्ता सापडला नाही,'' अशी माहिती 108 रुग्णवाहिकेतर्फे देण्यात आली. या पार्श्वभूमीवर 108 रुग्णवाहिकेने प्रतिसाद दिला नसल्याचा पटलवार पोलीस दलातर्फे करण्यात आला आहे. 

आणखी वाचा - बारामतीकरांचे सोने खरेदीचे आकडे वाचून थक्क व्हाल

''108ची रुग्णवाहिका घटनास्थळावर आली नाही. रुग्णाला रिक्षेतून रुग्णालयात घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. पण, ते शक्य झाले नाही. अखेर रस्त्याने जाणारा छोटा टेंम्पो अडवला आणि त्याला रुग्णालयात हलविले. साडेचार वाजेपर्यंत पोलीस तेथे होते,'' असे पोलिस समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी दिली. पोलिसांच्या कोणत्या यंत्रणामुळे मध्यरात्री साडेबारा वाजता ड्युटी बदलेल, 108 ला फोन केलेल्या पोलिसांचा संपर्क होत नसेल तर, रुग्णवाहिकेच्या चालकाने नियंत्रण कक्षाची संपर्क का नाही केला,''  असे सवाल कदम बीव्हीजी ईएमएसच्या व्यवस्थापनाला केले.  

 
पुणेकरांची चिंता वाढली; सदाशिव पेठेत औषधाच्या दुकानातील 33 जण कोरोना पॉझिटीव्ह!

''रुग्णाला रात्री अस्वस्थ वाटू लागले. त्याचे वेळी 108 या आपत्कालीन रुग्णवाहिकेला दूरध्वनीवरून फोन केला. पण, त्याला प्रतिसाद मिळाला नाही. आत्ता-येतो, नंतर-येतो अशी उत्तरे रुग्णवाहिकेकडून मिळत होती. अशा स्थिती रुग्णाच्या नातेवाईकांनी रात्री साडेबारा वाजता रुग्णाला रस्तावर खुर्चीत बसविले.'' या दरम्यान पोलीस कंट्रोल रूमकडून घटनास्थळी रवाना होण्याचा कॉल मिळाला. मार्शल आणि नाईट राऊड पोलीस ऑफिसर घटनास्थळा तातडीने दाखल झाले. त्याच वेळी पोलीसांनाही रात्री एक वाजता 108 क्रमांकावर फोन लावला. रात्री साडेतीन वाजेपर्यंत पोलीस रुग्णवाहिकेला फोन करत होते. कमला नेहरू रुग्णालयातील रुग्णवाहिका पाठवतो, असे सुरवातीला सांगितले. नंतर, भारती विद्यापीठातील रुग्णवाहिका देत असल्याचे उत्तर मिळाले. पण, प्रत्यक्षात साडेतीन वाजेपर्यंत रुग्णाला कोणतीही रुग्णवाहिका मिळाली नाही. 

आणखी वाचा - पुण्याच्या रेडी झोनमध्ये आता धारावी पॅटर्न

या दरम्यान, रुग्णाच्या हालचाली थांबल्या होत्या. रस्त्यावरून जाणाऱया दोन रुग्णवाहिका पोलिसांनी थांबविल्या. रुग्णाला रुग्णालयात घेऊन चला, अशी विनंती केली. डॉक्टर नाही, म्हणून पहिल्या रुग्णवाहिकेने रुग्णाला घेतले नाही. तर, कॉल असल्याचे सांगत दुसऱया रुग्णवाहिकेने रुग्णाला घेण्यात असमर्थता दर्शविली, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

 आणखी वाचा - पुण्यात सरकारी कार्यालये सुरू होण्याचे संकेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT