Electricity 
पुणे

पुणे : 'या' ६ तालुक्‍यातील नव्वद टक्के वीज पुरवठा झाला सुरळीत!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : गेल्या आठवड्यात झालेल्या चक्रीवादळामुळे पुणे जिल्हयातील मावळ, खेड, जुन्नर, आंबेगाव, मुळशी आणि वेल्हे तालुक्‍यांमध्ये सर्व प्रकारच्या 6 लाख 33 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. बुधवारपर्यंत (दि.10) टप्प्याटप्प्याने 5 लाख 68 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात महावितरणला यश आले आहे. त्यामध्ये 1142 पाणीपुरवठा योजनांचा समावेश आहे. 

'निसर्ग'चक्रीवादळामुळे प्रामुख्याने मावळ, जुन्नर व मुळशी या तालुक्‍यातील डोंगरदऱ्यांच्या भागात वीजयंत्रणेचे मोठे नुकसान झाले होते. या तीन तालुक्‍यांसह आंबेगाव, वेल्हे व खेड तालुक्‍यांमध्ये उच्च व लघुदाबाचे सुमारे 3195 वीजखांब जमीनदोस्त झाले होते. तर सावधगिरीचा उपाय म्हणून काही ठिकाणी वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. वादळामुळे महावितरणच्या वितरण यंत्रणेचे सुमारे साडेपाच कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. 47 उपकेंद्र व 389 उच्चदाब वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा खंडित झाला होता.

या सर्व उपकेंद्रांचा व उच्चदाब वाहिन्यांचा वीजपुरवठा मंगळवारी (दि. 9) सुरु करण्यात महावितरणला यश आले. त्यामुळे बाधित एकूण 6 लाख 33 हजार पैकी आतापर्यंत घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील 4 लाख 86 हजार 553, सर्वच 19 उच्चदाब पाणीपुरवठा योजनांसह 1194 पैकी 1142, मोबाईल टॉवरची 209 पैकी 184 अशा एकूण 5 लाख 68 हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. 

सद्यस्थितीत उच्चदाब वीजवाहिन्यांची दुरुस्ती झाल्याने 862 पैकी 761 मुख्य गावांचा वीजपुरवठा पूर्ववत झाला आहे. उर्वरित 101 छोटी गावे, वाड्यावस्त्या व पाड्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी लघुदाब वीजवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम वेगाने सुरु आहे. महावितरणचे 850 अभियंते व कर्मचारी तसेच 62 कंत्राटदारांचे 550 कर्मचारी साधनसामग्रीसह सध्या दुरुस्ती कामे करीत आहेत.

पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील 19 अभियंते आणि कर्मचाऱ्यांची पथके या भागात पाठविण्यात आली आहेत. 2900 लोखंडी व सिमेंटचे खांब, 30 वितरण रोहित्र, 35 किलोमीटर वीजतार, 300 डिस्क व पीन इन्सूलेटर पाठविण्यात आले असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Files: ''रुपाली चाकणकरच पीडितांना खरातकडे पाठवायच्या'', महिला नेत्याचे गंभीर आरोप, केली अटकेची मागणी

Mumbai Crime: प्रेयसीने ब्रेकअप केलं, तरुणाचा संताप अनावर, भररस्त्यात तरुणीला गाठलं अन्...; मुंबईत काय घडलं?

Dabhol beach dolphin rescue : डोल्फिन मासा दिशा भटकला अन् आला किनाऱ्यावर, नंतर तरूणांनी जे केलं आश्चर्यकारक, ग्रामस्थही म्हणाले...

Property Card Scheme: राज्यातील मालमत्ताधारकांसाठी खुशखबर! नागरिकांना मिळणार मिळकतपत्रिका; काेणत्या दहा जिल्ह्यात राबतेय याेजना..

Chandrapur Crime : 5 हजार रुपयांचं विष अन् खाकी वर्दीला काळिमा! प्रेमसंबंधाला विरोध केला म्हणून मिल्कशेक पाजून लेकीनंच पोलिस बापाला संपवलं

SCROLL FOR NEXT