पुणे

भारतीय संगीत प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. रामचंद्र देखणे

सकाळवृत्तसेवा

पुणे : भारतीय संगीत प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा‌ कार्यकाळ दोन वर्षांचा असेल. साहित्य कला आणि संस्कृती या क्षेत्रांत डॉ. देखणे कार्यरत असून वैचारिक, ललित, संशोधनात्मक व संत साहित्यावरील अनेक ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत.

भारतीय संस्कृती-संगीत आणि लोककला या संदर्भात संशोधनात्मक विपुल लेखनही केले आहे. बहरुपी भारुडांचे प्रयोग करीत लोककलेच्या क्षेत्रात त्यांनी योगदान दिले आहे. भारतीय संगीताचे शास्त्रशुध्द अध्ययन, अध्यापन, संशोधन आणि प्रसार करणारी तसेच गांधर्व महाविद्यालय चालविणारी भारतीय संगीत प्रसारक मंडळ ही संस्था गेली ८८ वर्षे कार्यरत आहे. प्रतिवर्षी भारत आणि भारताबाहेर विदेशातीलही दोन हजाराहून अधिक विद्यार्थी येथे संगीताचे अध्ययन करतात. संगीत शिक्षणाची व अभ्यासक्रमाची एक प्रतिष्ठत संस्था ती सुपरिचित आहे.

या विद्यालयाची स्थापना  8 मे 1932 रोजी पुणे येथे केली. सुमारे दहा वर्षे या संस्थेमार्फत अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ या संस्थेच्या अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जात होत्या. पुढे संस्थेकडून 9 फेब्रुवारी  1942 रोजी ‘भारतीय संगीत प्रसारक मंडळ’ या विश्वस्त संस्थेची स्थापना करण्यात आली. त्याचे पदाधिकारी म्हणून दत्तो वामन पोतदार (अध्यक्ष), लक्ष्मण भोपटकर (उपाध्यक्ष), विद्याधर दामले (खजिनदार), पुरुषोत्तम पंडित (चिटणीस) यांची आणि कार्यकारी सभासद म्हणून ग. ह. रानडे, सदाशिव मोने, दत्तात्रय वि. पलुस्कर आणि खुद्द विनायकराव यांची निवड झाली. या संस्थेकडून संगीत परीक्षांचा अभ्यासक्रम आखण्यात आला आणि तेव्हापासून भारतीय संगीत प्रसारक मंडळाच्या अभ्यासक्रमानुसार गांधर्व महाविद्यालय, पुणे या संस्थेत संगीतविषयक परीक्षांचे आयोजन केले जात आहे.

गांधर्व महाविद्यालयात भारतीय शास्त्रीय संगीतातील हिंदुस्तानी व कर्नाटक संगीत, सुगम संगीत इत्यादी गायनप्रकार; हार्मेनियम, तबला इत्यादी वाद्ये; भरतनाट्यम् व कथक इत्यादी नृत्यप्रकार या विषयांतील शिक्षण दिले जाते. यांमध्ये प्रारंभिक ते संगीत विशारद, संगीत अलंकार पर्यंतचे अभ्यासक्रम शिकविले जातात. संस्थेमार्फत ऑनलाईन पद्धतीने देखील या परीक्षा घेतल्या जातात. भारतातील आणि परदेशातील अनेक विद्यार्थी रागदारी संगीत, सुगम संगीत, नृत्य, वादन इ.विषयातील परीक्षा देत असतात. आतापर्यंत सु. दहा हजार विद्यार्थ्यांनी या संस्थेतून संगीत शिक्षण घेतले आहे. गरजूंना अल्पदरामध्ये संगीत शिक्षणाची सोय आहे. तसेच विद्यार्थ्यांना ध्वनिमुद्रण, ध्वनीसंयोजन व दृक्-श्राव्य माध्यमे यांचेही शिक्षण दिले जाते. ग्रंथालयातील दुर्मीळ व ऐतिहासिक संगीतविषयक ग्रंथांचा संग्रह विद्यार्थ्यांकरिता व अभ्यासकांसाठी उपलब्ध आहे. विष्णू दि. पलुस्करांचे पुत्र द. वि. पलुस्कर यांनीही या संस्थेत संगीताचे शिक्षण घेतले होते.

संस्थेकडून विविध संगीत महोत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम इ. उपक्रमही राबवले जातात. गेली अठरा वर्षे संस्थेकडून वेगवेगळ्या संगीत संकल्पना केंद्रस्थानी ठेवून ‘विविध स्मृती संगीत समारोह’ याचे आयोजन करण्यात येते. संस्थेने स्थापन केलेल्या भारतीय संगीत प्रसारक मंडळाकडून संगीत क्षेत्रातील गुणीजनांना विविध पुरस्कारांनी गौरविले जाते. त्यामध्ये पं. विष्णु दिगंबर पलुस्कर संगीत शिक्षक गौरव पुरस्कार, पं. विनायकराव पटवर्धन जीवन गौरव पुरस्कार, रामकृष्णबुवा वझे पुरस्कार (नवोदित गायकांसाठी), पं. जी. एल. सामंत संगतकार पुरस्कार, पं. गोविंदराव टेंबे संगतकार पुरस्कार ह्यांचा समावेश आहे. हार्मोनियमवादक प्रमोद मराठे हे सध्या या संस्थेच्या प्राचार्यपदाची धुरा सांभाळत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT