Lockdown
Lockdown 
पुणे

दुसऱ्या लॉकडाउनची शंका उपस्थित झाल्यामुळे व्यावसायिकांना धास्ती

सकाळवृत्तसेवा

पुणे - लॉकडाउनच्या काळात सर्वाधिक फटका बसला तो ब्यूटी पार्लर, सलून आदी व्यावसायिकांना. शहरात मोक्याच्या ठिकाणी असलेल्या दुकानांचे भाडे, वीज बिल, कर्मचाऱ्यांचा पगार या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. 
अनलॉक झाले तरीही ग्राहकांचा असलेला थंड प्रतिसादामुळे नफा मिळविणे दूरच झालेले आर्थिक नुकसानही अजून भरून निघत नाही. तोवर आता दुसऱ्या लॉकडाउनची शंका उपस्थित झाल्यामुळे पुन्हा व्यवसाय बंद पडेल याची भीती ब्यूटी पार्लर व सलून चालकांना उद्‍भवत आहे. लग्नसराई, कॉलेज फेस्ट किंवा इतर कोणतेही कार्यक्रम म्हटले की, महिलांची धाव असते ती थेट ब्यूटी पार्लरकडे. सौंदर्य खुलविणारा या व्यवसायात दररोज हजारो रुपयांची कमाई. त्यामुळे उत्पन्नाचा चांगला पर्याय व कुटुंबाला हातभार म्हणून या व्यवसायात मोठ्या प्रमाणात महिला वर्गही कार्यरत आहेत. परंतु गेल्या वर्षी जी स्थिती उद्‍भवली होती ती आता पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी लॉकडाउन नकोचा सूर या ब्यूटी पार्लर, स्पा, सलूनचालकांनी लावला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गेल्या अनेक वर्षांपासून या व्यवसायात आहे. आमच्या सॅलॉनमध्ये फक्त पुरुषच नाही तर महिलाही येतात. मदतीसाठी तीन चार कर्मचारी आहेत. पुन्हा लॉकडाउन झाले तर या कर्मचाऱ्यांचा पगार, सॅलॉनच्या जागेचे भाडे अशा सर्व गोष्टींचा प्रश्‍न निर्माण होईल. शासनाने दिलेल्या निर्देशानुसार सर्व खबरदारी घेत ग्राहकांना सेवा पुरवत आहोत.
- महेश खानापुरे, सॅलॉनचालक

माझा सारख्या इतर महिलांना उत्पन्नाचा स्रोत निर्माण व्हावा यासाठी महिला व मुलींना ‘ब्यूटी पार्लर’चे प्रशिक्षण देत आहे. कोरोनामुळे सर्व खबरदारी घेतली जात आहे. परंतु पुन्हा लॉकडाउन जाहीर झाले तर, पार्लरवर अवलंबून असलेल्या कर्मचाऱ्यांनाही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागेल.
- वृषाली शेडगे, वृषाली ब्यूटी पार्लर

गेल्या ३५ वर्षांपासून मेकअप आर्टिस्ट म्हणून 
काम करत आहे. कामाची संख्या कमी जास्त होत होती; पण पूर्ण काम कधीच थांबले नव्हते. गेल्या वर्षी तब्बल सहा महिने कोणतेच काम नव्हते. आता काही प्रमाणात सुरु झाले आहे. पुन्हा लॉकडाउन झाले तर हे काम देखिल थांबेल.
- दिनेश नाईक, मेकअप आर्टिस्ट

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT