publication Modi 2 0 Political Mistakes Dr Gopal Guru pune sakal
पुणे

‘मोदी २.०’चे प्रकाशन : राजकीय चुकांच्या बेरजेवर सगळेच चिडीचूप; डॉ. गोपाळ गुरू

डॉ. गोपाळ गुरू यांचे प्रतिपादन; ‘मोदी २.०’चे प्रकाशन

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘‘देशाच्या इतिहासातील चुकांचा वापर हा सध्याच्या राजकारण्यांचे संरक्षणाचे साधन बनले आहे. पण, चुका म्हणजे सामर्थ्य कसे काय होऊ शकते? सध्याच्या राजकारणात ‘तुमच्या चुका, माझ्या चुका, म्हणजेच चुका’ या सूत्राचा सर्रासपणे अवलंब केला जात आहे.

यातून राजकारणी हे चुकांच्या बेरजेचे राजकारण करत असून, याउलट सर्वसामान्यांच्या आयुष्याच्या बाबतीत मात्र कायम वजाबाकीच होत आहे. यातूनच राजकारणात सध्या ‘चुका, चुका, सारेच चिडीचूप’ असे चित्र पहावयास मिळत आहे,’’ असे प्रतिपादन ज्येष्ठ राजकीय विचारवंत, विश्‍लेषक प्रा. डॉ. गोपाळ गुरू यांनी बुधवारी केले.

‘सकाळ’चे संपादक-संचालक श्रीराम पवारलिखित आणि सकाळ प्रकाशनातर्फे प्रकाशित ‘मोदी २.०’ या तीन पुस्तकांचे प्रकाशन बुधवारी डॉ. गोपाळ गुरू यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजा दीक्षित, उच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ अभय नेवगी, लेखक श्रीराम पवार आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

डॉ. गुरू पुढे म्हणाले, ‘‘ वास्तवातील दोन्ही बाजू मांडायला नैतिक धैर्य लागते. पत्रकार हा ऑब्जेक्टिव्ह असला पाहिजे. अन्यथा भक्त निर्माण होतात. हे खरेतर अहंकाराच्या विरोधात असलेले नैतिक अपील म्हणजे हे पुस्तक आहे. ’’

‘‘पवार यांची ही पुस्तके म्हणजे मोदी सरकारच्या गेल्या नऊ वर्षांच्या कार्यकाळातील राजकीय वस्तुस्थिती मांडणारा इतिहास आहे. या पुस्तकात पत्रकार साहित्यिक आचार्य अत्रेंच्या पद्धतीने भाषा वापरली आहे,’’ असे मत ॲड. अभय नेवगी यांनी व्यक्त केले.

‘‘देशात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी नावाचे वादळ होऊन गेले आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्याप्रमाणेच वादळ आहेत. भारतीय राजकारणात आतापर्यंतची ही दोन मोठी वादळे. यापैकी एकाचा वेध श्रीराम पवार यांनी लोकमाध्यमातून घेतला आहे,’’ असे मत डॉ. राजा दीक्षित यांनी व्यक्त केले.

या पुस्तकातील लेखन हे वस्तुनिष्ठ, परखड तरीही संयमी आणि एकंदरीत बुद्धिवादी आहे. त्यामुळे पवार यांचा समावेश ग्रंथकार संपादकांमध्ये करावा लागेल, असेही त्यांनी या वेळी सांगितले. ‘‘चिकित्सा, विश्लेषण आणि भाष्य हे तीन घटक आकसत आहेत. कारण राजकारण्यांना आता चिकित्सा नको आहे,’’ असे पवार यांनी सांगितले.

संशोधनपर लेखनाला संदर्भमूल्य असते. तेच संदर्भमूल्य पवार यांनी या पुस्तकांच्या लेखनातून दिले आहे, असे ‘सकाळ’चे संपादक सम्राट फडणीस यांनी प्रास्ताविकात सांगितले. उपसंपादक तनिष्का डोंगरे यांनी सूत्रसंचालन केले.

‘सकाळ’मुळे वृत्तपत्र स्वातंत्र्य अबाधित

‘सकाळ’चे संपादक-संचालक श्रीराम पवार यांनी पंतप्रधान मोदी या विषयावर लिहिलेले सर्व लेख छापून आणण्याचे स्वातंत्र्य सकाळ वृत्तपत्राने दिले, त्यामुळे खरे तर ‘सकाळ’चेही आभार मानले पाहिजेत. वृत्तपत्र स्वातंत्र्याबाबतचे पहिले प्रकरण ‘सकाळ’चे संस्थापक-संपादक नानासाहेब परुळेकर यांनी सन १९५७-५८ मध्ये पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयात नेले होते.

त्या वेळी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी वृत्तपत्रीय पाने व किंमत याबाबत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला होता. नेहरूंचा हा प्रयत्न वृत्तपत्रस्वातंत्र्य धोक्यात आणणारा होता. याविरोधात परुळेकर यांनी लढा दिला आणि त्यात त्यांना यश आले.

यामुळे वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य अबाधित राहिल्याची आठवण ॲड. अभय नेवगी यांनी सांगितली. दरम्यान, ‘सकाळ’ला अभ्यासू, जनसंवादी आणि पुरोगामी परंपरा लाभलेली आहे. ही परंपरा परुळेकर यांच्यापासून श्रीराम पवार यांच्यापर्यंत कायम आहे. या परंपरेमुळेच आजच्या समारंभात सहभागी झाल्याचा आनंद असल्याचे राजा दीक्षित यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Deshmukh Murder Case: कोण होते पंडित कमलाकर देशमुख, कशी झाली होती हत्या? सोलापूर हादरवणारी Exclusive माहिती

Hasan Mushrif Kagal : हसन मुश्रीफांच्या मनातलं आलं ओठावर, समरजित घाटगेंसोबत मनोमिलन करणाऱ्या अदृश्य शक्तीचं नाव केलं उघड; मंडलिकांवरही म्हणाले...

Credit Card Offer: लाइफटाइम फ्री क्रेडिट कार्ड ऑफर! कमी क्रेडिट स्कोअर असला तरीही चालेल! काय आहे ही नवी ऑफर?

Latest Marathi News Live Update : मालेगावात आंदोलकांचा कोर्टात शिरण्याचा प्रयत्न

आजारी पत्नीवर जादूटोणा करण्याचा प्रकार उघड! 'शेतात चाललं होतं भयानक कांड'; संगमनेर तालुक्यातील धक्कादायक घटना समोर..

SCROLL FOR NEXT