PULA facebook Group helps women doing home business and small business in lockdown 
पुणे

पुणे लेडीज फेसबुक ग्रुपची कमाल! लॉकडाऊनमध्ये गृहउद्योग करणाऱ्या महिलांना 'अशी केली मदत

सकाळवृत्तसेवा

पुणे : कोरोना या साथीच्या आजाराने देशभरात छोट्या आणि गृहउद्योगांना आर्थिक फटका बसल्याने, पुण्यातील या व्यवसायांना चालना देण्यासाठी सोनिया कोंजेटी यांनी 'पुला'च्या माध्यमातून पुढाकार घेतला. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळातही या गृहउद्योग आणि लघुउद्योग करणाऱ्या महिलांना त्यांचे उत्पादन वितरण करण्यास शक्य झाले. 


'पुला'(PULAपुणे लेडीज फेसबुक ग्रुप) महिला उद्योजकांसाठी एक व्यासपीठ आहे जे त्यांना व्यवसाय सुरू आणि विस्तृत करण्यासाठी मदत करते. महिला उद्योजकांना सक्षम बनविणे हे पुलाचे मुख्य उद्दीष्ट आहे. हे व्यासपीठ ग्राहकांपर्यंत पोहोचणे आणि त्यांच्याशी जुडण्यास उपयुक्त आहे. मुख्य म्हणजे विक्रेत्यांना त्यांची विक्री प्रक्रिया पुढे नेण्यास मदत करते. लॉकडाऊनच्या काळात या व्यवसायांना चालना देण्यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या पुणे पोलिसांकडून घेण्यात आल्या. तसेच छोट्या व्यवसायांना सुरळीत चालू ठेवण्यास आणि त्यांची उत्पादने पुणे शहरातील ग्राहकांपर्यंत पोचविण्यास मदत करण्यात आले असल्याची माहिती 'पुला'च्या संथापक सोनिया कोंजेटी यांनी दिली.

- कोरोनामुळे जामीनावर सुटलेल्या कैद्यांनी वाढवली पोलिसांची डोकेदुखी!

"आम्हाला पुण्यातील प्रत्येक महिलेला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवायचे आहे आणि आमच्या व्यासपीठाचा उपयोग करुन त्यांना जास्तीत जास्त उत्पन्न मिळावे यासाठी मदत करण्याचा प्रयत्न आहे. समाज माध्यमाचा वापर करत हा प्रयत्न कसा यशस्वी करता येईल यावर अधिकाधिक लक्ष केंद्रित करत आहोत. त्याचबरोबर या महिला उद्योजकांसाठी फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून अश्या प्रकाच्या सुविधा देण्याचे कार्य करत आहोत." 
- सोनिया कोंजेटी, पुला-संस्थापक

- पुणे : १५ जूनपासून कडक लॉकडाउन अमलात येणार? महापालिका आयुक्त म्हणतात...!

'पुला' आणि महिला उद्योजक
- 'पुला'मध्ये पुण्यातील सुमारे अडीच लाख महिलांचा समावेश 
- इच्छुक महिलांना लहान प्रमाणात व गृहउद्योग सुरू करण्यास मदत करते 
- लॉकडाऊनच्या काळात दररोज सुमारे 300 ऑर्डर्स ग्राहकांपर्यंत पोच

पुण्यातील मार्केट यार्डाबाबत महत्वाचे अपडेट; वाचा सविस्तर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT