Corona-patients 
पुणे

पुण्यात नव्या रुग्णांचा आकडा पुन्हा वाढला; दीडशेचा टप्पा ओलांडला!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोनामुक्तांच्या रोजच्या आकड्यांमुळे पुणेकरांत आता कुठे समाधान दिसत असतानाच गुरुवारी (ता.१४) मात्र नवे 163 रुग्ण सापडल्याने पुन्हा धास्ती निर्माण झाली आहे. तरीही दिवसभरात कोरोनापासून बरे झालेल्या 109 जणांसह आतापर्यंत सुमारे दीड हजार रुग्ण पूर्णपणे ठणठणीत झाले आहेत.

दरम्यान, दिवसभरात 6 रुग्णांचा जीव गेल्याने मृतांची संख्या 169 झाली आहे. आणखी चिंतेची बाब म्हणजे, 116 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. 

महापालिकेसह खासगी रुग्णालय आणि ससूनमध्ये उपाचर घेत असलेल्या कोरोना रुग्णांचा गुरुवारी मृत्यू झाल्याची नोंद आहे. हे सर्व मृत 40 आणि 60 पेक्षा अधिक वयाची असून, त्यांना अन्य आजार असल्याचेही तपासण्यांमधून स्पष्ट झाले आहे. 

सध्या रोज शंभरहून अधिक रुग्ण बरे होत आहेत. त्यात काही दिवसांपूर्वी वाढलेल्या नव्या रुग्णांचा आकडा आता थोडासा कमी झाल्याचे दिसून आले आहे. परंतु, गुरुवारी अचानक नव्या रुग्णांची संख्या 163 इतकी झाली आहे. दिवसभरात 1 हजार 414 जणांचा "स्वॅब' तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. 

कोरोनाचा रुग्ण सापडल्यापासून शहरातील सुमारे 27 हजार 349 नागरिकांच्या घशातील द्रव पदार्थांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी आतापर्यंत 2 हजार 987 नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे निषन्न झाले आहे. त्यातील 1 हजार 486 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना घरीही सोडण्यात आले आहे.

त्याशिवाय, कोरोनासह अन्यही आजार असलेले 169 रुग्ण मरण पावले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या डॉ. नायडू हॉस्पिटलसह खासगी रुग्णालयांमध्ये 1 हजार 332 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 116 रुग्णांची स्थिती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले असून, त्यातही 34 जण व्हेंटिलेटरवर आहेत.

- पुण्याच्या बातम्यांसाठी येथे  क्लिक करा

दरम्यान, संपूर्ण शहरात घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करण्याची मोहीम अंतिम टप्प्यांत आहे. त्याशिवाय, गरजेनुसारही काही भागांतील नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2026 Winner: स्मृती मानधानाच्या RCB ने इतिहास रचला, दुसऱ्यांदा जिंकले जेतेपद; दिल्ली सलग चौथ्यांदा फायनलमध्ये पराभूत

Aishwarya Special Wishes to Abhishek: ऐश्वर्याने अभिषेकला वाढदिवसाच्या दिल्या खास शुभेच्छा; लहानपणीचा फोटो शेअर केला अन् म्हणाली...

WhatsApp Scam : व्हॉट्सॲप ‘गुंतवणूक’ सापळा, तिघांना सव्वा कोटींचा गंडा; व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे शेअर बाजारात गुंतवणूक पडली महागात

झेडपीसाठी उद्या मतदान! सोलापूर जिल्ह्यात 8 वर्षांत वाढले 3.27 लाख मतदार; लाडक्या बहिणींचा टक्का वाढला; 2017 मध्ये झाले होते 66.96 टक्के मतदान, वाचा...

Meghalaya Coal Mine Blast : मेघालय हादरलं! अवैध कोळसा खाणीत भीषण स्फोट, मृतांचा आकडा १८ वर; अनेक अडकल्याची भीती

SCROLL FOR NEXT