Crime_Arrest 
पुणे

जीव प्यारा म्हणून एजंटने 20 लाख दिले; 50 लाखांची सुपारी घेतल्याचे सांगून दोघांनी लुटले

सकाळ वृत्तसेवा

पुणे : जीवे मारण्यासाठी 50 लाखांची सुपारी घेतल्याची धमकी देऊन जमीन खरेदी-विक्री करणाऱ्या एजंटाकडून 20 लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या तरुणासह त्याच्या साथीदाराला अंमली पदार्थ आणि खंडणी विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई शनिवारी (ता.२०) दुपारी कोंढवा परिसरामध्ये करण्यात आली. 

सागर दत्तात्रय फडतरे (वय 29, रा. बोपगाव, पुरंदर), गणेश दत्तात्रय फडतरे (वय 29, रा. बोपगाव, पुरंदर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी कोंढवा येथील एका जमीन खरेदी-विक्री करणाऱ्या एजंटाने खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा कोंढवा परिसरामध्ये जमीन-खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. त्यास काही दिवसांपुर्वी एका अनोळखी व्यक्तीने मोबाईलद्वारे संपर्क साधला. त्यावेळी "तुमची 50 लाखांची सुपारी मिळाली असून जीव वाचवायचा असेल, तर 20 लाख रुपये द्या' अशी मागणी केली. त्यानंतरही आरोपीने तक्रारदाराला सातत्याने फोन करून त्यांच्याकडे खंडणीसाठी तगादा लावला. या प्रकारामुळे व्यावसायिकाने थेट पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाकडे (पूर्व विभाग) याबाबत तक्रार केली. 

पोलिसांनी तक्रारीची दखल घेऊन शुक्रवारी कोंढवा परिसरातील तक्रारदाराच्या कार्यालयाच्या परिसरात सापळा रचला. तक्रारदाराने सांगितल्यानुसार, आरोपी 20 लाख रुपयांची खंडणी घेण्यासाठी तक्रारदाराच्या कार्यालयात आला. त्याने तक्रारदाराकडून 20 लाखांची खंडणी घेतली. त्याचवेळी परिसरात दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याचा मित्र गणेश फडतरे हा देखील या गुन्ह्यात सहभागी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी त्यालाही अटक केली.

संबंधीत तरुणांकडून आणखी काही नागरीकांना याच पद्धतीने खंडणी मागितल्याची शक्‍यता आहे, त्यामुळे अशा नागरीकांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले. अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे, सहाय्यक पोलिस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई केली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT