The Pune based Brinton Pharmaceuticals Company will export anti-viral drugs to 18 countries 
पुणे

Corona Virus : पुण्यातील 'ही' कंपनी 18 देशांना अँटी-व्हायरल औषध निर्यात करणार

सकाळवृत्तसेवा

पुणे : पुण्यातील ब्रिंटन फार्मास्युटिकल्स कंपनी जगभरातील 18 देशांमध्ये अँटी-व्हायरल औषध फाविफिरावीर निर्यात करण्यासाठी सज्ज झाली आहे. हेच औषध देशातील नागरिकांपर्यंत पोचविण्यासाठी भारतीय औषध नियंत्रकाच्या मंजुरीची प्रतीक्षेत आहे.
 
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनानाच जगभरात उद्रेक झाला आहे. त्यावर प्रभावी क्षमतेचे औषध म्हणून फाविफिरावीर पुढे येत आहे. त्यासाठी वेगवेगळ्या देशांमध्ये या औषधाच्या चाचण्या सुरू आहेत. भारतात ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स ही या औषधाच्या तिसऱया टप्प्यातील चाचण्या सुरू करत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारतात चाचण्या संपल्यानंतर ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) भारतीय बाजारपेठेत औषध आणणायला परवानगी देण्याची शक्यता आहे.  फूजीफिल्म कॉर्पोरेशनच्या सहाय्यक जपानच्या फुजीफिल्म तोयमा केमिकल कंपनी लिमिटेडने विकसित केलेल्या औषधाची बाजारपेठ करण्यास मान्यता देण्याची शक्यता आहे. हे औषध अद्याप कोरोनाच्या उपचारांतील प्रोटोकॉलचा भाग नाही, असेही येथे स्पष्ट करण्यात आले. कोरोनाचा संसर्गावरील प्रभावी औषध असा दावा करण्यात आला आहे.

ब्रिंटन फार्माचे व्यवस्थापकीय संचालक राहुलकुमार दर्डा म्हणाले, “हैदराबादमधील ऑप्टिमस फार्मा त्यांच्यासाठी औषध निर्माण करीत आहे. फुजीफिल्म ओप्टिमस या औषधासाठी आवश्यक घटक पुरवते. त्याच्या मदतीने अँक्टिव्ह फार्मास्युटिकल इंग्रेडियन (एपीआय) तयार केले जाते. ते पुरविलेले औषध घटक नेपाळ, कंबोडिया, व्हिएतनाम, कॅनडा, कॅरिबियन देशांना निर्यात करतो.” ब्रिंटनकडे जवळपास १० हजार औषधांच्या गोळ्यांचा साठा निर्यातीसाठी सज्ज आहे. या औषधांच्या किंमतीबद्दल बोलताना ते म्हणाले, “

पुणेकरांनो कोरोनाच्या उपचाराच्या खर्चाची चिंता सोडा; ही बातमी वाचा!

किंमतीबद्दल, दर्डा म्हणाले की, नेपाळसारख्या देशांमध्ये औषधाची किंमत दहा गोळ्यांच्या एका स्ट्रिप्सची सुरवातीची किंमत सुमारे अडीच हजार रुपये असेल. रुग्णाला 14 दिवसांच्या कोर्ससाठी अंदाजे २० गोळ्या घ्यावी लागतील. किंवा त्यापेक्षा जास्त दिवस रुग्णाला गोळ्या घ्याव्या लागल्या तर त्या उपचारांचा खर्च पाच हजार रुपयांपर्यंत जाईल.
मात्र, भारतात हे औषध वितरण सुरू झाल्यास त्यांची किंमत कमी होईल, अशी अपेक्षा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. 

कोरोनाची प्रत्येक बातमी ठरतेय पुणेकरांसाठी महत्त्वाची; कारण...
फाविफिरावीर हे अवीगन या ब्रँड नावाने विकले जाते. इन्फ्लूएन्झा प्रकारच्या विषाणूंच्या संसर्गाच्या उपचारावर या औषधाला मान्यता देण्यात आली आहे. ब्रिंटन हे फॅव्हिटाँन या ब्रँडखाली औषधाची विक्री करणार आहे. हे औषध 200 आणि 400 मिलीग्रॅमच्या उपलब्ध करण्यात येणार आहे.
 
पुण्यात पाणी होतय शुध्द; गोंगाटही कमी झाला

दर्डा म्हणाले, “फुजीफिल्मचे औषधाचे पेटंट गेल्या वर्षी संपले. त्यामुळे ही कंपनी आता जगभरातील 60 पेक्षा जास्त देशांना औषध चाचण्यांसाठी मदत करत आहे. देशातील चाचण्या यशस्वी झाल्यानंतर ग्लेनमार्क आणि सिप्लासारख्या फार्मा कंपन्या औषध निर्माण आणि वितरण करतील, अशी अपेक्षा आहे. चीनमधील वुहानच्या काही रुग्णांवर ही औषधे वापरण्यात आली. त्या रुग्णांमध्ये सकारात्मक परिणाम दिसून आला आहे.”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral News : कारागिराने जबड्यात लपविले 15 लाखांचे सोने, पण 'या' एका चुकीमुळे उघड झाली चोरी

१० लाख शेतकऱ्यांनी भरल पीकविमा! डाळिंबसाठी आज तर सिताफळासाठी ३१ जुलैला संपणार मुदत; ॲग्रीस्टॅक असेल तरच भरता येणार पीकविमा

Latest Marathi News Updates: हरिद्वारमध्ये बुडणाऱ्या कावडियांना एसडीआरएफच्या जवानांनी वाचविले

Cyber Fraud Alert: सायबर फसवणुकीचा नवा प्रकार; काय आहे 401# कोड आणि त्याचे धोके, जाणून घ्या आणि आताच सावध व्हा!

Python Enters House Video: भयानक! मोबाइल बघत बसली होती मुलं, तितक्यात घरात शिरला महाकाय अजगर अन् मग...

SCROLL FOR NEXT