जगदीश मुळीक
जगदीश मुळीक  sakalmedia
पुणे

Pune News : भाजपच्या नव्या कार्यालयाचे शुक्रवारी उद्घाटन; जगदीश मुळीक

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे महापालिकेच्या जवळ नवीन कार्यालय शोधल्यानंतर आत सत्ताधारी भाजपने देखील ‘सन्मान’ हॉटेल मधील कार्यालय सोडले आहे. महापालिकेच्या समोरच नवीन कार्यालय उभारले आहे. ३ डिसेंबर रोजी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे.

गेल्या अनेक वर्षापासून भाजपचे शहर कार्यालय बुधवार पेठेमध्ये होते. ती जागा कमी पडत असल्याने व पार्किंगचा प्रश्‍न निर्माण होत असल्याने २०१७ च्या महापालिका निवडणुकीच्या पूर्वी भाजपने नव्या कार्यालयाचा शोध सुरू केला. जंगली महाराज रस्त्यापासून अगदी जवळ असलेल्या हॉटेल सन्मान मध्ये भाजपचे नवे कार्यालय सुरू करण्यात आले. या ठिकाणावरूनच भाजपने महापालिका निवडणूक, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची यंत्रणा हलवली होती. महापालिकेत प्रथमच शंभर नगरसेवक निवडून येऊन सत्ता काबीज केली.

सन्मान येथील कार्यालयाचा करार संपवल्याने भाजपचे महापालिकेच्या जुन्या इमारतीच्या समोर हे कार्यालय असणार आहे. शहराध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले, या कार्यालयाचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये ३ डिसेंबरला होणार आहे. या ठिकाणी शहराध्यक्ष, सरचिटणीस यांच्यासह विविध आघाड्यांचे अध्यक्ष यांच्यासाठी केबिन, बैठकीसाठी हॉल व इतर सुविधा आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: नसीम खान यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला यश? पुण्यात धंगेकरांच्या प्रचारासाठी लावली हजेरी

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईच्या गोलंदाजांची कमाल, केकेआरला पॉवर प्लेमध्येच दिले चार धक्के

Rohit Sharma MI vs KKR : टी 20 वर्ल्डकपचा संघ जाहीर होताच मुंबईच्या प्लेईंग 11 मधून रोहितचं नाव गायब, काय आहे कारण?

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Latest Marathi News Live Update : जीएसटी फक्त अदानींच्या फायद्याचा- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT