Gold-Shopping 
पुणे

लॉकडाऊनमध्येही सोन्याला झळाळी; अक्षय तृतीयेनिमित्त पुणेकरांची ऑनलाईन सोने खरेदी!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : अक्षय तृतीया म्हणले की पुण्यातील सराफी पेढ्या ओसंडून वहात. मात्र, यंदा 'कोरोना'मुळे पेढ्यांचे टाळे उघडले नसले तरी ऑनलाईन सोने खरेदीला पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. सराफांनाही दिलासा मिळाला आहे. हिंदू धर्मातील साडेतीन शुभ मुहूर्तापैकी अक्षय तृतीया हा एक शुभ मुहूर्त मानला जातो.  

या दिवशी सोने खरेदी केल्याने घरात समृद्धी राहते, अशी भावना असल्याने दरवर्षी सोने खरेदीला सराफी पेढ्या ग्राहकांनी भरलेल्या असतात. यावेळी कोरोनाचे संकट निर्माण झाल्याने बाजारपेठ बंद आहे. त्यामुळे सराफ व्यापार्यांनी ऑनलाईन आणि फोन बुकींगद्वारे सोने खरेदीची संधी ग्राहकांना उपलब्ध करून दिली. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कोणी करनावळीवर ५० टक्के सूट दिली, तर खरेदीत १० टक्क्यांपर्यंत सूट दिली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

रांका ज्वेलर्सचे वस्तूपाल रांका म्हणाले, "अक्षय तृतीयेला सोने खरेदी हा ग्राहकांसाठी श्रद्धेचा विषय असतो. त्यामुळे आम्ही ऑनलाईन व फोन द्वारे बुकिंग घेत आहोत. आज ४६ हजार ५०० भाव असला तरी ४५ हजार ५०० हा भाव फिक्स करून बुकींग घेतले आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ५०० पेक्षा जणांनी १ ग्रॅम पासून ते ५० ग्रॅम पर्यंत सोने घेतले आहे. ग्राहकांनी पूर्ण पैसे भरले की त्यांना खरेदीत ई-प्रमाणपत्र दिले जात असून, लाॅकडाऊन संपले की सोने दिले जाणार आहे. या कालावधीत भाव कमी झाले तर ग्राहकांना त्याचा परतावा केला जाणार आहे.''

चंदुकाका सराफ ज्वेलर्सचे सिद्धार्थ शहा म्हणाले, "वर्षानुवर्षे जे ग्राहक थेट दुकानत येऊन सोने घेत होते ते आज फोनवर बुकींग घेत आहेत. आमचे ग्राहक संपर्कात रहावेत यासाठी बुकींग घेतल्या. यास अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला आहे. करनावळीवर ५० टक्के सूट देण्यात आली आहे.''

दरवर्षीच्या तुलनेत  १० टक्के खरेदी

दरवर्षी अक्षय तृतीयेला पुण्यात सुमारे अडीचशे कोटी रुपयांचे सोने खरेदी केले जाते. मात्र, लाॅकडाऊनमुळे रविवारी केवळ १० टक्के व्यवसाय झाला आहे. यामध्ये ८५ टक्के ग्राहक शुद्ध सोने खरेदी करत आहेत, तर उर्वरीत १५ टक्के दागिने बुक करत आहेत. यंदा लाॅकडाऊन असल्याने खरेदी कमी असली तरी हा प्रतिसाद अपेक्षेपेक्षा जास्त आहे, असे रांका यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाची ज्ञानेश कुमारांना नोटीस, तर राहुल गांधींनाही फटकारलं; SIR प्रकरणी याचिकेवर सुनावणी

Krishna Sugar Factory Karad : कराडच्या कृष्णा साखर कारखान्याचे गाळप बंद?; राजू शेट्टी कारखानास्थळी दाखल, घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त

सातव्या महिन्यात डिलिव्हरी, माझ्या अंगाला सूज, एका रात्रीत आयुष्य बदललं; मराठी मालिकांची लीड हिरोईन, आता काय करते?

Latest Marathi News Update : संजय राऊत मातोश्री ऐवजी थेट शिवतीर्थावर, राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं

Market Crash: अमेरिकेपासून दक्षिण कोरियापर्यंत बाजार कोसळले! भारतात सेन्सेक्स-निफ्टीची तुफान तेजी; गुंतवणूकदारांचा पैसा कुठे वळला?

SCROLL FOR NEXT