Parvati-Lights 
पुणे

कोरोनाविरोधात एकवटले पुणेकर; लक्ष्य-लक्ष्य दिव्यांनी उजळली पुण्यनगरी!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : 'कोरोना'च्या अक्राळविक्राळ संकटावर मात करताना या लढाईत कोणीही एकटे नाही, सर्वजण एक आहोत हा एकात्मतेचा संदेश देताना घरोघरी पेटलेल्या पणत्या, दिव्यांनी प्रसन्न वातावरण निर्माण झाले. गॅलरी, खिडक्यात लावलेल्या दिव्यांनी आसमंत उजळून गेले. आपापल्या गॅलरीत एकत्र आलेल्या नागरिकांनी 'भारत माता की जय', 'वंदे मातरम्', 'गो कोरोना गो' अशा घोषणाही दिल्या. 

'कोरोना'ला प्रतिबंध करण्यासाठी म्हणून देश २१ दिवस लाॅकडाऊन करण्यात आला. कोरोना विरोधात लढणाऱ्या यंत्रणेला अभिवादन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी   थाळी, घंटी वाजविण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर आज रात्री ९ वाजता नऊ मिनिटांसाठी घरातील लाईट बंद करून दिवे, पणत्या व मोबाईलचा फ्लॅश लावण्याचे आवाहन केले. 

रात्रीचे नऊ वाचण्यासाठी १०-१५ मिनीट शिल्लक असताना घरांमध्ये दिवे लावण्याची गडबड सुरू झाली. गॅलरी, दारात, खिडक्यांममध्ये दिवे ठेवले. बरोबर नऊ वाजता पटापट घरातील लाईट बंद झाल्या, घरातील मंडळी एकत्र येऊन ९ वाजता दिवे लावले. 

प्रत्येक घरातील लाईट बंद असली तरी ऊंच इमारतींवर दिव्यांच्या प्रकाशाने जनू काय लायटिंग केली आहे असाच भास निर्माण झाला. दिव्यांमुळे परिसर उजळून निघत असताना, मोबाईलच्या टॉर्चही चमकत होत्या. प्रत्येक घरात सर्वजन एकत्र आल्याने गेल्या काही दिवसांपासून घरात बसलेल्या ज्येष्ठ, लहान मुलांमध्ये उत्साह निर्माण झाला. दिवाळीच आली आहे असा आनंद त्यांच्या चेहर्यावर दिसत होता. काहींनी महामृत्युंजय मंत्र, गायत्री मंत्रांसह भजनाचा नादही ससोसायट्यांमध्ये घुमत होता. भारत माता की जय... वंदे मातरम्... गो कोरोना... अशा घोषणांना देताना 'सामाजिक अंतर' राखूनही एकजूटीचे दर्शन घडले. अवघ्या ९ मिनिटांच्या या दीपोत्सवाने प्रसन्न वातावरण निर्माण झाले होते. 

- दीपोत्सवात सर्व कुटुंबीय एकत्र
- एकट्याने रहाणार्या ज्येष्ठांनी पेटविले दिवे
- काही ठिकाणी फाटके फोडले
- घोषणाबाजी करत एकोप्याचे दर्शन 
- ९ मिनिटांनी पुन्हा घरातील दिवे सुरू

शिस्तबद्ध दीपोत्सव 

'जनता कर्फ्यू'च्या दिवशी पंतप्रधान मोदींनी थाळी वाजविण्यासाठी सांगितले, तर अतिउत्साही लोकांनी रस्त्यावर येऊन मिरवणूका काढल्या. तसेच आजचा दीपोत्सव साजरा करताना काही ठिकाणी फटाके फोडले, तर काही ठिकाणी वस्तीतील काही तरुण मुले, महिला रस्त्यावर आले असे किरकोळ प्रकार सोडले, तर नागरिकांनी शिस्तीमध्ये अतीउत्साही न दाखवता 'सामजिक अतंर' राखून अवघ्या ९ ते १० मिनीटात शिस्तीत 'इव्हेंट' साजरा केला. 

दिव्यांमधूम साकारले 'होप'

'कोरोना'चे संकट लवकर दूर व्हावे यासाठी प्रत्येकजण प्रार्थना करत आहे. दीपोत्सव साजरा करताना बालेवाडी येथील साई ईशान्य सोसायटीमध्ये दिव्यांमधून 'होप' हा शब्द साकारत यातून सुटका होईल असे सुचविण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Council decision : सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना मोदी सरकारकडून 'GOOD NEWS' ; दैनंदिन वापरातील वस्तू स्वस्त होणार

No GST on Insurance: आरोग्य व जीवन विम्यावर शून्य GST; तुमच्या पॉलिसीचा हप्ता किती कमी होणार?

GST tax slabs : 'जीएसटी' बैठकीत मोठा निर्णय ; आता फक्त दोनच टॅक्स स्लॅब असणार

Uday Samant: लंडनमध्ये ‘मराठी भाषा केंद्र’! महाराष्ट्र मंडळाची इमारत ताब्यात घेणार

Video : दादर रेल्वे स्थानकाच्या पार्किंगमध्ये अग्नितांडव, १० ते १२ दुचाकी आगीच्या भक्ष्यस्थानी; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

SCROLL FOR NEXT