fadnavis_Shivsena 
पुणे

'तुम्ही मुख्यमंत्री होता, तेव्हा कारवाई का केली नाही?' शिवसेनेचा फडणवीस यांच्यावर पलटवार!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : मुंबई महापालिकेने मुस्लिम बांधवांचे पार्थिव दफन करण्यासाठी ज्या संस्थेला परवानगी दिली, त्यावरून टीका करणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे महापालिकेवर काय करवाई करणार, असा सवाल शहर शिवसेनेने केला आहे. कोणत्याही धर्मांमधे अंत्यसंस्कार हे पुण्यकर्म मानले जाते. अंत्यविधीचे राजकारण करणे सभ्य व सुसंस्कृत असल्याचा दावा करणाऱ्या नेत्याला शोभत नाही, असा टोलाही पक्षाच्या वतीने फडणवीस यांना लावण्यात आला आहे. 

मुंबई महानगरपालिकेने पीएफआय या संस्थेला मुस्लिम बांधवांचे पार्थिव दफन करण्यासाठी परवानगी दिली आहे. ही संस्था राष्ट्रद्रोही कारवाया करते, असा आरोप करून फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष करण्याचा प्रयत्न केला. त्यावर बुधवारी (ता.३) शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, सहसंपर्कप्रमुख शाम देशपांडे, प्रशांत बधे आणि महापालिकेतील पक्षाचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी पत्रक काढून फडणीसांवर टीका केली. 

पीएफआय संघटना ही राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये जर सहभागी असेल, तर तुम्ही पाच वर्षे मुख्यमंत्री होता. तेव्हा त्यांच्यावर पाच वर्षे कारवाई का नाही केली, याचे उत्तर त्यांनी जनतेला आधी दिले पाहिजे. एखादी संस्था राष्ट्रविरोधी कारवाया करणारी असेल तर त्यांचे समर्थन कोणीही करणार नाही, पण याच संस्थेला भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे महानगरपालिकेने 13 एप्रिल रोजी परवानगी दिली.

ही संघटना पुण्यामध्ये राष्ट्रहिताचे काम करत होती म्हणून परवानगी दिली? का केवळ उद्धव ठाकरे यांच्या व्यक्तिद्वेशातून मुंबई महानगरपालिकेला लक्ष करण्याचे काम केले जात आहे. जेव्हा एखाद्या कोरोना बाधित मृतांचे नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी पुढे येत नसतील, तर हे संस्कार करण्यासाठी एखादी संघटना किंवा व्यक्ती पुढे आल्यास त्यात एवढा गहजब कशासाठी असा सवालही पक्षाकडून करण्यात आला आहे. 

मृतात्त्म्यांचे व पार्थिवाचे कोणीही राजकारण करू नये, असा सर्वधर्मीय व सर्वपक्षीय संकेत आहेत. परंतु आपण सत्तेसाठी एवढे आतुर झाला आहात की माजी मुख्यमंत्र्यांनी कसे वागावे हा दिलेला परिपाठ ही आपण विसरून गेला आहात. स्वर्गीय रामभाऊ म्हाळगी, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, नितीन गडकरी यांनी विरोधी पक्षांमध्ये असताना जी मूल्ये जोपासली. त्यालाही तुम्ही तिलांजली दिली, अशी टीकाही त्यांनी केली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Tariff Announcement : डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी सहा देशांवर फोडला टेरिफ बॉम्ब; जाणून घ्या, आता कुणाचा नंबर लागला?

Liquor Shop Viral Video : दारूसाठी तडफड! ; दुकानाच्या खिडकीच्या ग्रिलमध्येच अडकलं दारूड्याचं डोकं अन् मग...

ENG vs IND, 3rd Test: रिषभ पंत आर्चरचा लॉर्ड्सवर सामना करण्याबद्दल म्हणाला, 'तो परत येण्याचा मला...'

Video: मी इथेच आहे, तुझ्यासोबत! पत्नी आयसीयूमध्ये, पतीने हात धरला अन्...; वृद्ध जोडप्याचा व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

Viral Video: कसाबसा जीव वाचला! रस्त्याची पाहाणी करायला आलेल्या अभियंत्यासमोरच कोसळला ट्रक, जीव वाचवण्यासाठी लोकांची पळापळ

SCROLL FOR NEXT