pune crime free style clash between two groups sakal
पुणे

Pune News : जमिनीच्या वादावरून पुण्यात भररस्त्यात दोन गटांत फ्री स्टाईल हाणामारी

पुण्यातील येरवडा येथील शिवराज चौक रस्त्यावर दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

पुण्यातील येरवडा येथील शिवराज चौक रस्त्यावर दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे.

पुणे - सध्या मोबाईलवर मारहाण करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात पंजाबी लोक एक व्यक्तीला भररस्त्यात मारहाण करताना दिसत आहेत. अनेकांना वाटलं की हा व्हिडिओ पंजाबमधील आहे. मात्र हा रस्त्यावरील मारामारीचा व्हिडिओ पुण्यातील असल्याची माहिती मिळत आहे. पुण्यातील येरवडा येथील शिवराज चौकात रस्त्यावर दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. (pune crime free style clash between two groups)

पुण्याती शिवराज चौक परिसारातील या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून भर रस्त्यावर मारामारीचा प्रकार घडल्याने याची चर्चा सुरु झाली आहे. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारामारीत मुक्तार सिंग भादा यांच्यासह इतर काहीजण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, जागेच्या वादातून हा प्रकार घडला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

या प्रकरणातील मारामारी करणारे हे सराईत गुन्हेगार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे येरवड्यात भर रस्त्यात गुन्हेगारांचा धिंगाणा सुरु असताना पोलिसांचा गुन्हेगारावर वचक नसल्याचे समोर आलं आहे. येरवडा पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी देखील काम करावं, अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anuskura Ghat Road Repair : कोकण-पश्चिम महाराष्ट्र प्रवास आता सुसाट! अणुस्कुरा घाटातील 25 किमी रस्त्याचे होणार मजबुतीकरण, 5 कोटींचा निधी मंजूर

Mumbai: दत्तक प्रक्रियेवर निर्णय देण्यास जिल्हाधिकारीही सक्षम, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Latest Marathi News Live Update : सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला; बँकिंग क्षेत्रावर दबाव

Maharashtra Forest Land: राज्य सरकारचा निर्णय! वनजमिनींच्या नोंदी अद्ययावत होणार, प्रकल्पांना मिळणार गती, जिल्हाधिकाऱ्यांना काय दिले आदेश..

Parbhani News: केशर १२०, दशहरी १००, कर्नाटकी हापूस १५० रुपये किलो;परभणीच्या फळबाजारात आंब्याच्या दरात घसरण; सर्वसामान्यांना दिलासा

SCROLL FOR NEXT