Crime 
पुणे

पुणे : चारित्र्याच्या संशयावरून केला पत्नीचा खून; पतीला आजन्म कारावास

सकाळ वृत्तसेवा

पुणे : चारित्र्याच्या संशयावरून कु-हाडीने मान आणि डोक्यावर वार करून पत्नीचा खून करणा-या पतीस न्यायालयाने मरेपर्यंत कारावास (आजन्म कारावास) आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सत्र न्यायाधीश जी. पी. अग्रवाल यांनी हा निकाल दिला.

राजू दुसाणे (रा. आकाशनगर, वारजे) असे शिक्षा झालेल्या पतीचे नाव आहे. त्याने ३० जानेवारी २०१५ रोजी वारजे येथील त्यांच्या राहत्या घरी पत्नी सविता यांचा खून केला होता. या प्रकरणी विनोद सुभाष दाभाडे (रा. वारजे जकात नाक्याजवळ) यांनी फिर्याद दिली होती.

खून करण्याच्या एक महिना आधी सविता यांना एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला होता. हा फोन आल्याचे दुसाणे याने पाहिले होते. तेव्हापासून तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यानंतर त्याने पत्नीला मारहाण केली. तसेच एक दिवस सविता यांच्या साडीचा पदर पेटवून दिला होता. त्यांच्या मुलीने ती आग विझवल्याचे फिर्यादीत नमूद आहे. दुसाणे दाम्पत्याला दोन मुली आणि एक मुलगा आहे. या खटल्याचे कामकाज सरकारी वकील सुनील मोरे यांनी पाहिले.

खून करून पोलिसांत झाला हजर :
खून केल्यानंतर दुसाणे वारजे पोलिस ठाण्यात हजर झाला होता. मी पत्नीचा खून केला आहे, असे त्याने पोलिसांनी सांगितले होते. त्यानुसार त्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. त्यानंतर पोलिस त्याला घेऊन घरी गेले. खून करण्यासाठी वापरण्यात आलेली कु-हाड आणि आरोपीच्या अंगावरील कपडे पोलिसांनी जप्त केले होते.

हा गुन्हा परिस्थिती जन्य पुराव्यांवर आधारीत होता. साक्षीदाराने दुसाणे याला घराची कडी लावून घाईघाईन बाहेर पडताना पाहिले होते. तसेच आरोपींचे कपडे आणि कु-हाड जप्त करण्यात आली होती. वैद्यकीय अहवाल व इतर बाबींवर गुन्हा सिद्ध करता आला.
- ॲड. सुनील मोरे, सरकारी वकील

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Maskar Silver Medal : मुलीच्या रायफलसाठी वडिलांनी विकली जमीन; कोल्हापूरच्या सोनम मस्करचे आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक

Satara Crime: जमिनीचा वाद पेटला अन्‌ भावकीतील युवकावर दांडक्याने हल्ला; उपचार सुरू असतानाच मृत्यू

Importance of Literature : मनाची लाखो शकलं करणाऱ्या काळात साहित्य का गरजेचं आहे?

Marathi News Live Updates : भुसावळ शहरात कुजलेल्या अवस्थेत आढळला मानवी मृतदेह

Pune News: कुत्रा भुंकल्याने वाद पेटला; वाघोलीत दोन बहिणींवर दगड, सळई अन् लाथाबुक्क्यांनी हल्ला

SCROLL FOR NEXT