पुणे

Pune Lok Sabha Result: धंगेकरांच्या घरच्या मैदानात मुरलीधरांनी कशी घेतली आघाडी? नवीन धावपट्टी असूनही सुसाट...

Pune Lok Sabha Result 2024 : कसबा हा जुना भाग असल्याने तेथे अनेक प्रश्नांची गुंतागुंत आहे. त्यात वाहतूक समस्या, अरुंद रस्ते, अतिक्रमणे, कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, जुने वाडे अशा प्रमुख समस्या आहेत. त्या एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत.

योगीराज प्रभुणे yogiraj.prabhune@gmail.com

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत आमदार रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा दणदणीत पराभव केला होता. त्यामुळे पुणे लोकसभा निवडणुकीत कसबा विधानसभा मतदारसंघातून भाजपला मोठी आघाडी देण्याचे आव्हान कार्यकर्त्यांपुढे होते. पोटनिवडणुकीत दुधाने तोंड पोळल्याने लोकसभा निवडणुकीत ताकही फुंकून प्यायले, असे लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून दिसते.

कसबा हा पूर्वापार भाजपचा बालेकिल्ला. दिवंगत खासदार गिरीश बापट यांनी सलग पाच वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. मात्र, आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने येथे मुसंडी मारली. त्या पार्श्वभूमीवर कसबा मतदारसंघातील राजकीय घडामोडींना वेग आला होता.

पुणे महापालिकेच्या १५, १६, १७, १८, १९ आणि २९ प्रभाग क्रमांक मिळून हा कसबा मतदारसंघ होतो. त्यापैकी प्रभाग २९चा काही भाग कसब्यात येतो. धंगेकर यांच्यासाठी कसबा हे घरचे मैदान होते. त्यांनी यापूर्वी महापालिका, विधानसभा निवडणूक येथूनच लढविली होती. त्या तुलनेत भाजपचे विजयी उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी ही नवीन धावपट्टी होती. मात्र, पक्षाचे नेते, कार्यकर्ते आणि नगरसेवक यांनी कसब्याच्या पराभवानंतर पुन्हा संघटनात्मक बांधणी केली. पोटनिवडणुकीतील अपयशानंतर हेमंत रासने यांनी या भागात पुन्हा संपर्क सुरू केला. त्यात भाजपला यश मिळाले. या मोहोळ यांना १४ हजार ४८३ मतांची आघाडी मिळाली.

या मतदारसंघात भाजपचे १४ नगरसेवक होते. प्रत्येकाने आपापल्या प्रभागातून मोहोळ यांना मताधिक्य दिल्याचे दिसते. सदाशिव, नारायण, शनिवार या मध्यवस्तीतील पेठांमधील प्रभाग क्रमांक १५ मधून सर्वाधिक १८ हजारांची आघाडी मिळाली. त्याचा फायदा मोहोळ यांना निश्चित झाला. बापट यांना गेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून सुमारे ५२ हजार मतांची आघाडी मिळाली होती.

कसबा मतदारसंघाचे दोन सरळ भाग पडतात. शिवाजी रस्त्याच्या एका बाजूला असलेल्या मध्यवस्तीतील पेठा आणि लोकमान्य नगरसारखा उच्चभ्रू वर्गाचा भाग येतो. तर, शिवाजी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूच्या पेठांमधील वेगवेगळ्या जाती, धर्म आणि पंथाचा संमिश्र मतदार आहे. त्यात विशेषतः १७, १८ आणि १९ प्रभागांचा समावेश होतो. या प्रभागांमधून धंगेकर यांना फार मोठी आघाडी घेता आली नाही. अल्पसंख्याक मतदारांचे मतदान मात्र मोठ्या संख्येने धंगेकर यांना झाले. त्यामुळे मोहोळ यांना आघाडी मिळाली नाही.

कसबा हा जुना भाग असल्याने तेथे अनेक प्रश्नांची गुंतागुंत आहे. त्यात वाहतूक समस्या, अरुंद रस्ते, अतिक्रमणे, कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, जुने वाडे अशा प्रमुख समस्या आहेत. त्या एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: विखे पाटील मनोज जरांगेंच्या भेटीला; भुजबळांना म्हणाले, चर्चेत का सहभागी झाला नाहीत?

PM Modi Reaction on GST Reform : ‘’मी लाल किल्ल्यावरून म्हणालो होतो, की..’’ ; GST 'रिफॉर्म'वर मोदींची पहिली प्रतिक्रिया!

Asia Cup 2025 साठी कर्णधार सूर्यकुमारसह हार्दिक पांड्या दुबईला रवाना; कुठे करणार सराव, काय आहे वेळापत्रक; घ्या जाणून

Latest Marathi News Updates: अंबादास दानवे, संजय शिरसाट यांनी घेतली जरांगेंची भेट

Mumbai Local: मुंबई लोकलच्या 'या' मार्गावर काही लोकल रद्द, का आणि कधी? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT