An overview image highlighting Pune Municipal Corporation election preparations, political party strategies, and administrative arrangements ahead of polling.

 

esakal

पुणे

Pune Municipal Election Update : महापालिका निवडणुकांचा बिगुल तर वाजला; जाणून घ्या, पुण्यात सध्या काय आहे परिस्थिती?

Pune Municipal Election Announcement Explained : निवडणूक आयोगाची पत्रकारपरिषद होताच मुख्यमंत्री फडणवीसांचं महत्त्वपूर्ण विधान आलं समोर

Mayur Ratnaparkhe

Latest updates on the Pune Municipal Election : राज्यातील २९ महापालिकांसाठी आज राज्य निवडणूक आयोगाने पत्रकारपरिषद घेत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार १५ जानेवारी मतदा होणार असून १६ जानेवारी रोजी निकाल लागणार आहे. मुंबई, पुण्यासह राज्यातील जवळपास सर्वच बड्या महापालिकेच्या निवडणुका होणार असल्याने स्थानिक राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष आहे.  

मुंबईप्रमाणे पुणे महापालिका निवडणूक देखील राजकीय पक्षांसाठी अतिशय प्रतिष्ठेची असते, त्यामुळे या ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीचे चित्र नेमके काय असणार याकडे सर्वांचे लक्ष असते. दरम्यान निवडणूक कार्यक्रमाची घोषणा  झाल्यानंतर काही वेळातच खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलंय की, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात मैत्रीपूर्ण लढत असेल. तसेच, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत आम्ही बहुतांश ठिकाणी युती करण्याचा प्रयत्न करू असही त्यांनी म्हटलंय.

शिवाय, अजित पवार पुण्याचे पालकमंत्री आहेत आणि आचारसंहिता लागू होण्याआधीच पुणे महापालिकेच्या तब्बल ३ हजार कोटींच्या विकासकामांचं लोकार्पण झालंय. यावेळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघेही हजर होते. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे चित्र अद्याप स्पष्ट झालेल नाही. महापालिका निवडणुकीला कशाप्रकारे सामोरं जायचं, यावर त्यांची चर्चा सुरू आहे.

पुणे महापालिकेची मुदत १४ फेब्रुवारी २०२२ रोजी पुणे महापालिकेची मुदत संपली आहे. तर आगामी  निवडणुकीसाठी २०११ च्या जनगणनेच्या लोकसंख्येनुसार प्रभाग रचना करण्यात आली आहे. यामुळे पुण्यात प्रभाग संख्या ४२ राहणार असून, नगरसेवकांची संख्या १६५ राहणार आहे. तसेच, चार सदस्यीय प्रभाग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पुणे महानगरपालिकेसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारुप प्रभाग रचनेत ४ नगरसेवकांचे ४० प्रभाग (मतदारसंख्या ८४,०००), तर ५ नगरसेवकांचा १ प्रभाग (मतदारसंख्या १,०५०००)अशी रचना असणार आहे. प्रभाग क्रमांक ३८ हा ५ सदस्यांचा असणार आहे.

महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत मतदान केंद्रांची संख्या निश्‍चित केली जात आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रत्येक ९०० मतदारांमागे एक मतदान केंद्र असणार आहेत. यानुसार संपूर्ण शहरात ३ हजार ९४६ मतदान केंद्रांची निर्मिती केली जात आहे.

शिवाय, या निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ पर्यंत नोंदणी केलेल्या मतदारांना पुणे महापालिकेच्या निवडणुकीत मतदान करता येणार आहे. अशा मतदारांची संख्या ३५ लाख ५१ हजार ४६९ इतकी आहे. यामध्ये कसबा पेठ, शिवाजीनगर, कोथरूड, वडगाव शेरी, पुणे कॅन्टोन्‍मेंट, हडपसर, पर्वती, खडकवासला या शहरातील आठ विधानसभा मतदारसंघासह पुरंदर, शिरूर, भोर वेल्हा या ग्रामीण भागातील विधानसभा मतदार संघातील मतदारांचा पुणे महापालिकेच्या हद्दीत समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: जय शाहांकडून Lionel Messi ला टीम इंडियाची जर्सी भेट, T20 World Cup साठीही आमंत्रण; फुटबॉलचा बादशाह दिल्लीत काय म्हणाला?

Pune Fraud : "तुला 'एमबीबीएस'ला ऍडमिशन घेऊन देतो"; असं बोलून केली सव्वा कोटींची फसवणूक; पुण्यातील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल!

वर्षाच्या शेवटी अमृता खानविलकरची चाहत्यांना खास भेट! 'या' बॉलिवूड अभिनेत्यासोबत वेब सीरिजमध्ये झळकणार

Pune News : नागरिक सुरक्षेसाठी मोठे पाऊल; सिंहगड रस्त्यावर 'नऱ्हे पोलिस स्टेशनचे' दिमाखात उद्घाटन!

Latest Marathi News Live Update : जायगावला साकारणार जगातील पहिले राष्ट्रीय कांदा भवन

SCROLL FOR NEXT