devendra fadnavis
devendra fadnavis 
पुणे

देशातील पहिल्या इंडस्ट्रीअल पार्कचे रांजणगाव एमआयडीसीत उद्घाटन

सकाळवृत्तसेवा

पुणे: देशात महाराष्ट्राला उद्योजकांची गुंतवणुकीसाठी सर्वाधिक पसंती आहे. पुणे हे राज्याचे स्टार्ट अप हब असून, जर्मनीपाठोपाठ चीनच्या अनेक कंपन्यांनी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे. हायर इंडिया इंडस्ट्रीअल पार्कच्या माध्यमातून या परिसरात रोजगार निर्मिती बरोबरच विविध करांच्या रूपाने महसुलातही मोठी वाढ होणार आहे. या पार्कच्या माध्यमातून भारत आणि चीनचे औद्योगिक संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (गुरुवार) व्यक्त केला.

रांजणगाव एमआयडीसीतील हायर इंडस्ट्रीअल पार्कचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी हायर ग्रुपचे कार्यकारी अध्यक्ष लियांग हॅशन, हायर इंडीयाचे व्यवस्थापकीय संचालक साँग युजुन, हायर इंडीयाचे अध्यक्ष इरीक ब्रगॅन्झा, आमदार बाबुराव पाचर्णे उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, '२०१५ साली चीन दौऱ्यावेळी हायर कंपनीच्या अधिकाऱ्यांशी गुंतवणुकीबाबत चर्चा झाली होती. त्यानुसार या पार्कची उभारणी करण्यात आली आहे. मेक इन महाराष्ट्र अभियानांतर्गत राज्य शासनाने उचललेल्या सकारात्मक पावलामुळे हे शक्य झाले. हायर इंडीया इंडीस्ट्रीअल पार्क हा देशातील पहिला औद्योगिक पार्क आहे. या पार्कमुळे राज्यातील उद्योग जगतात सकारात्मक बदल होणार आहे. या पार्कमुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असून, विविध करांच्या रुपाने महसूलातही मोठी वाढ होणार आहे. त्याच बरोबर या परिसरातील पायाभूत सुविधांमध्येही अमुलाग्र बदल होईल.'

मेक इन महाराष्ट्र अभियानामुळे गेल्या तीन वर्षात महाराष्ट्राला गुंतवणुकदारांची सर्वाधिक पसंती मिळाली आहे. याला अनुकूल उद्योजक धोरण, कुशल मनुष्यबळ कारणीभूत आहे. राज्यात इंग्लंड, जपान, अमेरीका, जर्मनी, नेदनलॅण्ड या देशातील उद्योजकांची मोठी गुंतवणुक आहे. पुणे हे देशातील आठवे मोठे महानगर असून, प्रतिमाणसी उत्पादनात पुण्याचा सहावा क्रमांक लागतो. पुणे हे देशाचे स्टार्ट अप हब आहे. गुंतवणुकदारांची पुण्याला सर्वाधिक पसंती आहे.

पुणे शहर परिसरात मोठ्या प्रमाणावर ॲटोमोबाईल कंपन्यांनी आपले उत्पादन सुरू केले आहे. त्याच बरोबर जागतिक बँकेच्या सहकार्याने फुड क्लस्टर म्हणूनही पुणे विकसीत होत आहे. भाजी पाला व फळांवर प्रक्रीया करणारे अनेक उद्योग या निमित्ताने येथे उभे राहणार आहेत. राजीव गांधी आयटी पार्कच्या माध्यमातून अनेक सॉफ्टवेअर,हार्डवेअर कंपन्याही पुणे परिसरात कार्यरत आहेत. इंडो-जर्मनी करारामुळे पुणे परिसरात दोन हजाराहून अधिक जर्मन कंपन्या कार्यरत आहेत. आता चीनच्याही अनेक कंपन्या यापरिसरात येत आहेत. या पार्कच्या माध्यमातून रोजगाराला चालना मिळेल. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हायर इंडिया प्रकल्पाची पाहणी करून माहिती घेतली. यावेळी लियांग हॅशन, साँग युजुन, इरीक ब्रगॅन्झा यांची भाषणे झाली.

हायर इंडिया इंडस्ट्रीयल पार्कचे ठळक वैशिष्ट्ये:
१.      मेक इन इंडियाच्या धर्तीवरील मेक इन महाराष्ट्र अभियानातील गुंतवणूक.
२.      पार्कच्या माध्यमातून ६०० कोटी रुपयांची गुंतवणूक.
३.      हायर इंडियाच्या माध्यामातून थेट २००० नवीन रोजगाराची निर्मिती तर अप्रत्यक्ष दहा हजार जणांना रोजगार उपलब्ध.
४.      सन २०१५ साली महाराष्ट्र शासनाचा हायर इंडिया कंपनीशी गुंतवणुकीचा करार.
५.       सन २०१६ साली प्रकल्पाचे भूमिपूजन.
६.      या प्रकल्पाच्या माध्यमातून हायर इंडिया कंपनीच्या उत्पादन क्षमतेत दुपटीने वाढ होऊन रेफ्रिजरेटरचे उत्पादन १.८ मिलियन होणार.
७.      त्याचबरोबर या प्रकल्पात एलइडी टेलिव्हिजन, वाशिंग मशीन, वाटर हिटर आणि एअर कंडीशनरचे उत्पादनही होणार.
८.      सन २०१५ साली हायर इंडिया कंपनीने ‘मेक इन इंडिया अवार्ड फॉर एक्सलन्स’ हा पुरस्कार मिळविला होता.
९.      रांजणगाव मधील हा प्रकल्प ४० एकर क्षेत्रावर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : योगी आदित्यनाथ यांची काँग्रेसवर टीका; म्हणाले, काँग्रेसची जिझिया कर लावण्याची इच्छा

Virat Kohli : 'खूप फसवणूक झाली मात्र आता...' विराट कसा झाला 634 कोटी रूपयाचा मालक?

Car Maintenance Tips: कारची 'अशी' घ्या काळजी, अन्यथा लागेल गंज

Juice For Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी प्यायलाच हवेत 'हे ज्यूस, रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

SCROLL FOR NEXT