Pune News esakal
पुणे

Pune News : पुण्यात पालखी मिरवणुकीमुळे हे रस्ते बंद, वाहतुक कोणत्या दिशेने वळवणार? इथे वाचा पूर्ण यादी

पुण्यातले काही रस्ते बंद ठेवण्यात आले आहे. वाहतूक नियंत्रण शाखेने यासाठी विस्तृत योजना आखली आहे.

साक्षी राऊत

Pune News : आज पंढरपूरकडे निघालेल्या संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे सुरळीत आगमन होण्यासाठी पुणे शहर पोलिस सज्ज असून, मिरवणुका निघताना भक्तांची प्रंचंड गर्दी रस्त्यांवर होणार आहे. त्यामुळे पुण्यातले काही रस्ते बंद ठेवण्यात आले आहे. वाहतूक नियंत्रण शाखेने यासाठी विस्तृत योजना आखली आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की पुण्यात पालखी आगमनाच्या तारखांची पूर्वसूचना आधीच देण्यात आली होती. त्यामुळे रविवारी आणि त्याआधीपासून भक्तांची पुण्यात गर्दी दिसून येईल अशी पूरकल्पना पोलिसांना होती. G-20 परिषदेतदेखील यावर चर्चा झाली होती.

संत तुकाराम महाराज पालखी 10 जून रोजी पुण्यातील देहू मंदिरातून मार्गस्थ झाली. परंपरेनुसार, तुकाराम महाराज पालखी प्रस्थानाच्या रात्री देहू येथील इनामदार वाड्यात मुक्काम करून पिंपरी-चिंचवडमधील आकुर्डी येथे पोहोचते. रविवारी. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी रविवारी आळंदी येथून मार्गस्थ होणार आहे. रात्री आळंदीतील गांधी वाड्यात मुक्काम झाला.

दोन्ही मिरवणुका सोमवारी म्हणजेच आज पुण्यात दाखल होणार आहेत. दोन पालखी मंगळवारी पुण्यात एक दिवसाचा विसावा घेणार आहेत. संत तुकाराम महाराज पालखी निवडुंगा विठ्ठल मंदिरात आणि ज्ञानेश्वर महाराज पालखी विठोबा मंदिरात. दोन्ही मिरवणुका बुधवारी पुण्याहून पंढरपूरच्या दिशेने स्वतंत्र प्रवासाला सुरुवात करतील.

वाहतूकीतले हे बदल सोमवारी पहाटे 2 वाजल्यापासून नमूद केल्याप्रमाणे पालखी पुणे ओलांडेपर्यंत असेच असतील

संत तुकाराम पालखी बोपोडी चौकात पोहोचेपर्यंत:

बंद मार्ग : बोपोडी चौक ते खडकी बाजार.

पर्यायी मार्ग: चर्च चौक मार्गे अंतर्गत रस्ता.

बंद मार्ग : पोल्ट्री फार्म चौक.

पर्यायी मार्ग: रेल्वे पोलीस मुख्यालय, औंध रोड आणि ब्रेमेन चौक. (Ashadhi Wari)

तुकाराम महाराज पालखी इंजिनीअर कॉलेज चौकात पोहोचेपर्यंत

बंद मार्ग : जुना मुंबई पुणे रस्ता पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी बंद राहील.

पर्यायी मार्ग : भाऊ पाटील रोड औंध रोड ब्रेमेन चौक.

बंद मार्ग : आरटीओ ते अभियांत्रिकी महाविद्यालय चौक.

पर्यायी मार्ग: शाहीर अमर शेख चौक आणि कुंभार वेस. तसेच जहांगीर चौक, आंबेडकर सेतू मार्गे. (Pune)

संत ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या आगमनावेळी

बंद मार्ग: कळस फाटा ते बोपखेल फाटा.

पर्यायी मार्ग: अंतर्गत मार्ग वापरून धानोरी मार्गे.

बंद मार्ग: मेंटल हॉस्पिटल कॉर्नर ते आळंदी जंक्शन.

पर्यायी मार्ग: जेल रोड आणि एअरपोर्ट रोड मार्गे.

बंद मार्ग : सदलबाबा चौक ते पाटील इस्टेट.

पर्यायी मार्ग: पर्णकुटी चौक ते गॅरिसन अभियंता चौक. (Traffic)

Engineering College Chowkजवळ मिरवणुका एकत्र आल्यानंतर हे बदल होतील. हे बदल 12 जून रोजी दुपारी 12 वाजल्यापासून लागू होतील.

बंद मार्ग : रेंज हिल चौक ते संचेती चौक.

पर्यायी मार्ग: खडकी अंडरपास आणि पोल्ट्री फार्म चौक.

बंद मार्ग : खंडोजी बाबा ते वीर चाफेकर चौक

पर्यायी मार्ग : कर्वे रस्ता आणि सेनापती बापट रस्ता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात १४ विधेयकं मांडली, १२ मंजूर; चर्चेच्या वेळेत अन् प्रश्नोत्तरात कामकाज नापास

'हा' प्रसिद्ध राजकीय नेता अभिनेत्रीला करायचा अश्लिल मॅसेज, म्हणायचा..'हॉटेलवर चल' अभिनेत्रीने केला धक्कादायक अनुभव शेअर

बेस्ट पतपेढीत एकही जागा नाही, राज ठाकरे म्हणाले,'मला माहितीच नाही विषय, छोटी गोष्ट आहे रे'

'सावरखेड एक गाव' फेम अभिनेत्रीची छोट्या पडद्यावर दणक्यात एंट्री; 'स्टार प्रवाहच्या 'या' मालिकेत साकारणार भूमिका

माझ्या मुलाने आणखी काय करायला हवं? श्रेयस अय्यरला Asia Cup 2025 संघात संधी नाही मिळाली; वडिलांना राग अनावर

SCROLL FOR NEXT