उरुळी कांचन (ता. हवेली) : दुकानांना लागलेली आग विझवताना अग्निशामक दलाचे अधिकारी व कर्मचारी.
उरुळी कांचन (ता. हवेली) : दुकानांना लागलेली आग विझवताना अग्निशामक दलाचे अधिकारी व कर्मचारी. 
पुणे

उरुळीत पहाटे आग लागून पाच दुकाने जाळून खाक

जनार्दन दांडगे

उरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील चौधरी माथा परिसरात शुक्रवारी (ता. १७) पहाटे लाकडी गोडाऊन व इतर फर्निचर दुकानांना लागलेल्या आगीत पाच दुकाने जाळून खाक झाली असून सुमारे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

आज (शुक्रवार) पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीचे कारण समजू शकले नाही. या आगीमध्ये तुळजाभवानी टींबर मार्केट, श्रीकृष्ण होलसेल साडी डेपो, श्री दत्त फर्निशिंग, सोनाली इंटरप्रायजेस, श्री समर्थ फर्निचर हि दुकाने जाळून खाक झाली. यातील तुळजाभवानी टींबर मार्केटमध्ये ३५ ते ४० लाख रूपये किमतीचा सुमारे १५ ते १८ ट्रक एवढे सागवानी लाकडांचा साठा होता. संतोष जाधव, अतुल गायकवाड यांच्या श्रीकृष्ण होलसेल साडी डेपोमध्ये सुमारे ५० ते ६० लाखांच्या साड्या होत्या. तसेच स्वरूप कांचन यांचे श्री दत्त फर्निशिंग, बाळासो थोरात यांचे सोनाली इंटरप्रायजेस व शाम सुदाम जवणे यांचे श्री समर्थ फर्निचर या तिन्ही दुकानामध्ये सुमारे ५० लाख रुपयांचा माल होता.

रात्री सुरु झालेली आग विझविण्यासाठी हडपसर व मध्यवर्ती अग्निशामक केंद्राच्या एकूण तीन बंबाच्या साहाय्याने आग आटोक्यात आणण्यात आली. यामध्ये सुमारे ५ तास चाललेली आग आटोक्यात आणण्यासाठी मध्यवर्ती अग्निशामक केंद्राचे अधिकारी प्रमोद सोनावणे, मुख्य अग्निशामक अधिकारी (तांडेल) तानाजी गायकवाड, कर्मचारी शैलेश गोरे, महेंद्र सपकाळ, सोमनाथ मोरे, कैलास टकले, चंद्रकांत नवले, विलास धडस यांच्यासह एकूण १५ कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: कोल्हापुरात PM मोदींच्या भाषणाला सुरूवात

Ujjwal Nikam: "माझा जन्म हनुमान जयंतीचा", 'मविआ' उमेदवाराला कसं रोखणार या प्रश्नावर निकमांचा थेट युक्तिवाद

Ujjwal Nikam: उज्ज्वल निकम यांना भाजपकडून मुंबई उत्तर-मध्यमधून उमेदवारी जाहीर; पुनम महाजन यांचा पत्ता कट

IPL 2024 DC vs MI Live Score : मुंबईला तगडा झटका! खलीलने आक्रमक खेळणाऱ्या सूर्यकुमारचा अडथळा केला दूर

Pune News : पुण्याचे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांचे दीर्घ आजाराने निधन

SCROLL FOR NEXT