Corona 
पुणे

पुणेकरांनी एक महिना रोखली अपेक्षित रूग्णवाढ

सकाळवृत्तसेवा

पुणे - काटेकोरपणे केलेले लॉकडाउनचे पालन आणि कोरोनाबाधीतांच्या संपर्कातील प्रत्येक व्यक्तीची तातडीने केलेल्या तपासणीमुळे अपेक्षित रुग्णवाढ एक महिना पुणेकरांनी रोखली. या महिन्याभराचा उपयोग प्रशासनाने कोरोना संसर्गाच्या रुग्णांवर उपचाराची पायाभूत व्यवस्था उभारण्यासाठी केल्याचे दिसते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्यात ‘बेस्ट केस’नुसार १५ जूनपर्यंत रुग्णांची संख्या ४० हजारांपर्यंत वाढेल. त्यात दोन हजार जणांना अतिदक्षता विभागात दाखल करावे लागणार असल्याचा निष्कर्ष ‘एसईआयआर’ (सस्पेक्‍टिीबल-एक्‍स्पोजर, इन्फेक्‍शिुअस, रिमुव्हड ऑर रिकव्हर्ड) या प्रारुपाच्या आधारावर सरकारी आरोग्य यंत्रणांनी ८ एप्रिल रोजी काढला होता. त्यात सहा हजार रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात ठेवावे लागेल, असेही स्पष्ट केले होते. 

या पार्श्‍वभूमीवर पुणेकरांनी मार्चपासून सुरू झालेल्या लॉकडाउनचे नियम काटेकोरपणे पाळले. पुणेकर घरात थांबले. त्यामुळे पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधीतांचा ४० हजाराचा आकडा १५ जूनऐवजी १४ जुलैला नोंदला गेला, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागातील तज्ज्ञांनी दिली.

कोरोनाबाधीताच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचून, त्यांची तपासणी करण्याचा प्रयत्न महापालिका, जिल्हा आणि राज्याच्या आरोग्य खात्यातर्फे सुरू आहे. त्यामुळे संसर्गाचे प्रमाण नियंत्रित राहिले. 

धोका टळला नाही
कोरोनाबाधीत रुग्णसंख्येचा उच्चांक अद्यापही झाला नसल्याचे मत सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ वर्तवित आहेत. त्यामुळे अद्यापही कोरोनाचा धोका पूर्णतः टळलेला नाही. पुन्हा लॉकडाउन करावे लागणे, हा धोका टाळण्याच्या प्रक्रियेचा एक भाग असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सामाजिक अंतर, सॅनिटायझरचा वापर किंवा साबणाने हात धुणे, मास्क या त्रिसूत्रीतून संसर्गाचे प्रमाण कमी होईल, असा विश्‍वासही साथरोग तज्ज्ञांनी वर्तविला आहे.

४० हजार रुग्ण
पुणे जिल्ह्यात गेल्या १२६ दिवसांमध्ये कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेल्या ४० हजार रुग्णांची नोंद झाली. ९ मार्चला पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत गेली. 

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात ६० गाड्यांना भीषण आग; ४० दुचाकी आणि २० चारचाकी गाड्या जळून खाक

Army Dog Tyson Story : तीन दहशतवादी केले ठार! आर्मी डॉग टायसनच्या शौर्याची थरारक कहाणी; गोळी लागली तरी खचला नाही, पुढे जे झालं...

भारतीयांनो तातडीने इराण सोडा! अमेरिकेसोबतच्या संघर्षानंतर तेहरान दुतावासाचे निर्देश; कोणत्याही क्षणी हल्ल्याची शक्यता?

IND vs SA: कधीकधी अतिशहाणपणा नडतो...! अजिंक्य रहाणे प्रचंड संतापला; भारतीय संघाच्या पराभवावर म्हणाला, तुम्ही वॉशिंग्टन सुंदरला...

ऐश्वर्याला मुलगी झाल्यावर सलमान खानची 'ही' होती प्रतिक्रिया, म्हणालेला...'मी मामा झालो..'

SCROLL FOR NEXT