Lockdown-Police 
पुणे

लॉकडाऊनमध्ये बाहेर पडणाऱ्या पुणेकरांना पोलिसांचं चॅलेंज; आहे का मंजूर?

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ज्यांच्याकडे कोणताही पास नाही किंवा कोणतीही गरज नसताना बाहेर जायचंय, त्यांनी खुशाल जा ! पण आमची एक अट आहे. आधी 6 तास कोरोना संसर्ग झालेल्या 'रेड झोन'मध्ये पोलिसांसोबत ड्युटी करून दाखवावी. बोला मंजूर? शहरात विनाकारण फिरण्याची हौस असणाऱ्यांना पुणे पोलिसांनी ट्विटरद्वारे हे आव्हान दिले आहे, तर बोला आहे मंजूर! 

@PuneCityPolice या आपल्या ट्विटरद्वारे पुणे पोलिसांकडून हटके स्टाईलचे ट्विट वेळोवेळी केले जाते. ख्रिसमस, ३१ डिसेंबर, १ जानेवारी या दिवशी पुणे पोलिसांनी केलेले ट्विट मोठ्या प्रमाणात गाजले. त्यातही "ऐसे कैसे चलेगा दिदी" हे ट्विट चांगलेच गाजले होते. याबरोबरच वेळोवेळी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणारे, हेल्मेटचा वापर टाळणारे अशा अनेक प्रकारे कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या लोकांना पुणे पोलिसांच्या अधिकृत ट्विटर द्वारे नर्मविनोदी शैलीत त्यांचा खास समाचार घेतला जातो.

सध्या शहरात संचारबंदी सुरू आहे. असे असतानाही अनेकजण दररोज हजारो जण संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करीत रस्त्यावर येत असल्याचे चित्र आहे. अशा लोकांचा आता पुणे पोलिसांनी आपल्या खास शैलीत समाचार घेण्यास सुरुवात केली आहे. शहरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना @PuneCityPolice या ट्विटरद्वारे पुणे पोलिसांकडून शहरात फिरण्यासाठी आव्हान देण्यात आले आहे. मात्र, त्यासाठी एक अट घातली आहे.

शहरात विनाकारण फिरण्याची हौस असणाऱ्याना पुणे पोलिसांनी चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे. परंतु त्यासाठी पोलिसांनी एक अट घातली आहे. फिरण्याची भारी हौस असणाऱ्यांना आधी 6 तास कोरोना संसर्ग झालेल्या 'रेड झोन'मध्ये पोलिसांसोबत ड्युटी करून दाखवावी लागेल, तुम्हाला मंजूर आहे का? अशी विचारणा पोलिसांनी केली आहे. आता किती जणांना फिरण्याची आणि समाज सेवेची हौस आहे, बघुयात.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

परदेशी भक्तांकडून श्री विठ्ठलाच्या महापूजेची नोंदणी! अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, दुबईतील भाविक करणार महापुजा; मंदिर समितीला ९० लाखांचे उत्पन्न, वाचा...

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाहून परतताना भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू; पिकअपने धडक देताच बस उलटली

Pune Crime : प्रति तोळा फक्त ६० हजार, स्वस्त सोन्याच्या आमिषाने उकळले पैसे; दाम्पत्याला अटक

LPG Crisis: देशहितासाठी त्याग! ६ महिने सिलेंडरला पूर्ण ‘नकार’; महाराष्ट्रातील गावांचा मोठा निर्णय, LPG वापर बंद राहणार

Pune News : पतीला मारहाण अन् सासरच्यांना शिवीगाळ; पुण्यात पत्नीच्या 'क्रूर' वर्तनामुळे घटस्फोट मंजूर; कौटुंबिक न्यायालयाचा मोठा निकाल

SCROLL FOR NEXT