Pune police Exposes gang of interstate thieves by Checking out the 700 km CCTV footage 
पुणे

700 किलोमीटरचे सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आणि हाती आली चोरांची टोळी

सकाळवृत्तसेवा

पुणे : पुण्यासह राज्यातील अन्य शहरांमध्ये चोरीचे गुन्हे करणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या फरासखाना पोलिसांनी मुसक्‍या आवळल्या. तब्बल सातशे किलोमीटरच्या सीसीटीव्ही चित्रीकरण तपासून पोलिसांनी आरोपींचा माग काढत आरोपींना कर्नाटकमधून अटक केली. लक्ष्मण आचारी, शंकर लक्ष्मण आचारी, श्रीनिवास लक्ष्मण आचार, संजु व्येंकटेश नायडू, यादगीर लक्ष्मण आचारी व हरीश शेट्टी, मेरी व्येंकटेश आचारी, व्येंकटेश नायडू, शांता लक्ष्मण आचारी, आचारी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूगावातील सोने-चांदी विक्रेते करण माळी (वय 35) यांनी 31 डिसेंबरला रविवार पेठेमध्ये त्यांची कार पार्कींग केली होती. त्यावेळी त्यांच्या गाडीवर ऑईल सांडल्याचे भासवून त्यांच्या गाडीतील 55 लाख 62 हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले होते. या घटनेची फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

फरासखाना पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू होते. या घटनेचा तपास करताना पोलिसांनी घटना घडलेल्या ठिकाणापासून ते सासवड पर्यंतचे 700 सीसीटीव्ही तपासले. सीसीटीव्हीतील संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या अनोळखी दुचाकीस्वारांचा माग काढत पोलिस सासवडपर्यंत पोचले.

सासवडमधील एका बांधकाम प्रकल्पातील कामगारापर्यंत पोचल्यानंतर तेथील एका कामगाराला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने संबंधीत आरोपींनी त्यांचा मोबाईल वापरल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

कौतुकास्पद! पुण्यातील रिक्षा चालकाच्या मुलीला अमेरिकेतील कॉलेजची २ कोटींची स्कॉलरशिप​

वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक तपासावरुन पोलिसांनी कर्नाटकमधून शंकर आचारी यास अटक केली. त्याच्या चौकशीमध्ये त्याने त्याच्या साथीदारांसह हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या इतर साथीदारांचा शोध घेऊन त्यांना अटक केली. आरोपींनी फरासखाना पोलिस ठाण्यासह कोथरुड पोलिस ठाण्यातही याच पद्धतीने चोरी केल्याची कबुली दिली. 
 
अशी आहे गुन्हे करण्याची पद्धती 
पोलिसांनी अटक केलेली टोळी वेगवेगळ्या राज्यात जाते. तेथे गेल्यानंतर लहान मुलांच्या मदतीने वाहनांवर ऑईल टाकणे, घाण टाकणे असे प्रकार करतात. त्यानंतर गाडीची डिकी, काच उघडून पैशांची, वस्तुंची चोरी करतात.याबरोबरच गर्दीचा फायदा घेऊन सोने, पैसे चोरणे, पाकीट चोरणे यांसारखे गुन्हेही करीत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Shortage in India : पुढील 3 महिने गॅस सिलिंडर मिळणं कठीण? छगन भुजबळ यांनी दिला धोक्याचा इशारा, पाहा काय आहे कारण?

Land Scheme: अतिक्रमणधारकांना मोठा दिलासा! गरीबांसाठी घराचा मार्ग मोकळा; महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय

Latest Marathi News Live Update : नांदेड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन सतर्क, जिल्ह्यात आजपासून जमावबंदी

इराणला नवा साथिदार! अमेरिकेला धुडकावून इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा; मध्यपूर्वेत युद्धाचा भडका, युद्ध आणखी तीव्र होणार?

एकतर्फी प्रेमातून आधी पाठलाग, नंतर रस्त्यात गाठलं अन्...; तरुणानं तरुणीसोबत नको ते केलं...

SCROLL FOR NEXT