Pune-Startup-fest-21
Pune-Startup-fest-21 
पुणे

पुणे स्टार्टअप फेस्टचे उद्या उद्घाटन

सकाळवृत्तसेवा

पुणे - कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील भाऊज आंत्रप्रिनरशिप (बीईसी-सीओईपी) विभागाच्यावतीने ‘पुणे स्टार्टअप फेस्ट - २०२१’ चे (पीएसएफ) ऑनलाइन आयोजन करण्यात येत आहे. २७ आणि २८ फेब्रुवारीला ‘बोल्स्टरिंग इनोवेशन - ब्ल्यू प्रिंट फॉर द फ्युचर’ या कल्पनेवर तो होत आहे. या फेस्टचे उद्‌घाटन शनिवारी सकाळी साडेनऊला मॅरीको लिमिटेडचे संस्थापक अध्यक्ष हर्ष मारिवाला आणि ‘सकाळ’च्या संचालिका मृणाल पवार यांच्या हस्ते ऑनलाइन होणार आहे. विद्यार्थी वर्गामध्ये उद्योग व उद्योजकतेविषयी आवड निर्माण करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना स्टार्टअप इकोसिस्टिमचा परिचय करून देण्यासाठी बीईसी-सीओईपीकडून दरवर्षी २०१९ पासून ‘पीएसएफ’चे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांद्वारे आयोजित करण्यात येणारा व विविध विद्याशाखांच्या तज्ज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन लाभलेला पुणे स्टार्टअप फेस्ट (पीएसएफ) हा राज्यातील सर्वात मोठा स्टार्टअप फेस्ट आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हा फेस्ट एक प्रकारचा स्टार्टअप एक्सपो आहे. ज्याद्वारे आर्थिक तज्ज्ञ, ट्यूटर - अभ्यासक , अंडरस्ट्डिज आणि नवोदित व्यावसायिक अशा विविध लोकांना एकाच छताखाली आणण्याचा प्रयत्न केला जातो. या फेस्ट अंतर्गत नवोदित स्टार्टअप्सना विविध प्रकारे निधी मिळविण्यासाठी आणि मार्गदर्शनाची संधी दिली जाते. तसेच विद्यार्थ्यांना स्टार्टअप्समध्ये इंटर्नशिप करण्याची संधी दिली जाते.

सीओईपीचे संचालक प्रा. बी. बी. आहुजा यांच्या नेतृत्वाखाली हा तिसरा फेस्ट आयोजित केला जात आहे. ‘पीएसएफ’ कडे १२५ हून अधिक नवीन स्टार्टअप्स, जवळपास ८५ हून अधिक गुंतवणूकदार व मार्गदर्शक यांच्यासह १८ हजारांहून अधिक साक्षीदार असलेली दुसऱ्या फेस्टची यादी असून , पीएसएफ २०२० फेस्टच्या इतर ठळक गोष्टींमध्ये ५०० हून अधिक जास्त इंटर्नशिपच्या संधी, उद्योजकीय जगातील नामांकित व्यक्तींचे मुख्य भाषण आणि गुंतवणुकीचा समावेश आहे. पुणे स्टार्टअप फेस्ट - २०२१ साठी स्टार्टअप इंडिया, स्किल इंडिया, शिक्षण मंत्रालय - इनोवेशन सेल आणि ‘सकाळ माध्यम समूह आदी संस्थांचे सहकार्य लाभले आहे.

हर्ष मारिवाला यांची मुलाखत 
फेस्टच्या उद्घाटनप्रसंगी मृणाल पवार या मॅरीको लिमिटेडचे संस्थापक अध्यक्ष हर्ष मारिवाला यांची मुलाखत घेणार आहेत. आपल्या कुटुंबाच्या पारंपारिक व्यवसायात काळानुसार कसा बदल केला आणि व्यवसाय जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत कसा पोहचला, याविषयी हर्ष मारिवाला यांचा जीवनप्रवास विद्यार्थ्यांपर्यंत मांडण्यात येणार आहे.

माध्यमांची भूमिका ही सामाजिक परिवर्तन करून, सुविधा देणारी यंत्रणा किंवा सामाजिक परिवर्तनाचा दुवा म्हणून असली पाहिजे. यासाठी ‘सकाळ’ने लोकशाहीचे चारही स्तंभ एकत्र करून सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनांच्या दिशेने एकत्र काम करण्याची जबाबदारी घेतली आहे. विद्यार्थ्यांमध्ये स्टार्टअप संस्कृती वाढवणे आणि त्यांना जॉब क्रिएटर बनण्यास मदत करणे, हा ‘सकाळ’चा आणखी एक विचारप्रवाह आहे.
- मृणाल पवार, संचालिका, सकाळ माध्यम समूह

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: नसीम खान यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला यश? पुण्यात धंगेकरांच्या प्रचारासाठी लावली हजेरी

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईच्या गोलंदाजांची कमाल, केकेआरला पॉवर प्लेमध्येच दिले चार धक्के

Rohit Sharma MI vs KKR : टी 20 वर्ल्डकपचा संघ जाहीर होताच मुंबईच्या प्लेईंग 11 मधून रोहितचं नाव गायब, काय आहे कारण?

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Latest Marathi News Live Update : जीएसटी फक्त अदानींच्या फायद्याचा- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT